नवरात्रोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात गाभाऱ्याची स्वच्छता पूर्ण, आज दागिन्यांची स्वच्छता, पोलीस अधीक्षकांकडून सुरक्षा व्यवस्थेचा आढावा

upcoming festivals

कोल्हापूर प्रतिनिधी : शारदीय नवरात्रोत्सव (upcoming festivals)अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपला आहे. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीतर्फे सुरू असणारी करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरातील तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. बुधवारी मंदिरातील गर्भगृहाची स्वच्छता करण्यात आली, तर गुरुवारी देवीच्या दागिन्यांची स्वच्छता करण्यात येणार आहे. दरम्यान, जिल्हा पोलीसप्रमुख शैलेश बलकवडे यांनी मंदिर परिसरातील सुरक्षा व्यवस्था व तयारीचा आढावा घेतला.

नवरात्रोत्सवासाठी (upcoming festivals)मंदिराची रंगरंगोटी, तसेच स्वच्छतेचे काम गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. बुधवारी मंदिरातील गर्भगृहाची स्वच्छता श्रीपूजक यांनी केली. स्वच्छता सुरू असताना अंबाबाईची मूळ मूर्ती इरल्याने झाकण्यात आली होती. सायंकाळपर्यंत ही स्वच्छता सुरू होती. त्यामुळे भाविकांसाठी देवीच्या मूळ मूर्तीचे दर्शन बंद करण्यात आले होते, तर उत्सवमूर्ती भाविकांना दर्शनासाठी ठेवण्यात आली होती. सायंकाळी ७ नंतर सरस्वती मंदिराशेजारी देवीच्या मूळ मूर्तीची पूजा बांधून ती दर्शनासाठी खुली करण्यात आली होती.

upcoming festivals      upcoming festivals

बुधवारी जिल्हा पोलीसप्रमुखांनी मंदिर परिसराची पाहणी करून सुरक्षेचा आढावा घेतला. त्याचबरोबर मंदिरातील अतिक्रमण, भाविकांसाठीचा दर्शन मार्ग, पालखी मार्ग यासह महाद्वारातील मुखदर्शन व्यवस्था यांची पाहणी केली. मंदिर परिसरातील पोलीस सुरक्षा यंत्रणा, पोलीस नियंत्रण कक्ष, सीसीटीव्ही यंत्रणा, आपत्ती व्यवस्थापन कक्ष, चप्पल स्टँडचे नियोजन यासह विविध गोष्टी व उपाययोजनांचा आढावा घेतला. विद्यापीठ हायस्कूल परिसर, जुना राजवाडा, भवानी मंडप, महाद्वार परिसर, सरलष्कर भवन, घाटी दरवाजा परिसरातही पाहणी करण्यात आली.

यावेळी शहर डीवायएसपी मंगेश चव्हाण, जिल्हा विशेष शाखेचे पो. नि. तानाजी सावंत, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे सपोनि नागेश मात्रे, देवस्थान समितीचे व्यवस्थापक महादेव दिंडे, अभियंता सुरेश पाटील, मनपाचे आरोग्य निरीक्षक ऋषीकेश सरनाईक, सीसीटीव्ही यंत्रणा प्रमुख राहुल जगताप, उपशहर अभियंता नारायण भोसले यांच्यासह पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

upcoming festivals

हेही वाचा :