कोल्हापूरातल्या ‘या’ गावाने पोलिसात दिली विचित्र तक्रार..!

कोल्हापूर जिल्ह्यातील राशिवडे येथील मारुती देवालयाजवळ ग्रामपंचायतीच्या जागेमध्ये असणारी सार्वजनिक (public) मुतारी अज्ञात व्यक्तिने चोरुन नेल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. याबाबत अज्ञाताविरुध्द राशिवडे ग्रामपंचायतीच्यावतीने राधानगरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. मुतारी रातोरात पाडून गायब केल्याने तीन लाखाचे नुकसान झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, मारुती देवालयाजवळ शांतीनाथ लोखंडे व महादेव मगदुम या दोघांच्या इमारतींच्या मध्यभागी शासकीय जागेमध्ये (public) सार्वजनिक मुतारी होती. काल रात्री ही मुतारी अज्ञातांनी जमीनदोस्त करत साहीत्यांची परस्पर विल्हेवाट लावल्याचे सकाळी ग्रामस्थांच्या नजरेस आले. त्यानंतर या घटनेची माहीती सरपंच कृष्णात पोवार, उपसरपंच रंगराव चौगले, ग्रामविकास अधिकारी विराज गणबावले यांना देण्यात आली.

public

 

कोल्हापूर : अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा नोंद
पो.पाटील उतम पाटील यांना बोलावुन घटनेचा पंचनामा करण्यात आला, यामध्ये सार्वजनिक मुतारी पाडल्याने तीन लाखाचे नुकसान झाल्याचे नोंद करण्यात आले आहे. या घटनेबाबत ग्रामस्थांतुन त्रीव संताप व्यक्त होत असुन ग्रा.पं.वतीने अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. राशिवडे सार्वजनिक मुतारी अज्ञाताने रातोरात जमीनदोस्त करुन साहीत्याची विल्हेवाट लावली.

हेही वाचा :


करिअरमधला पहिलाच रॅम्प वॉक अन् अभिनेत्री झाली ट्रोल Video

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *