दौलतच्या सुरळीत कारभारा वक्रदृष्टी का ?अँड. संतोष मळविकर यांचा प्रसिद्धी पत्रकातून आमदार अनिल बेनके यांना प्रश्न

चंदगड : कधी कालचा अवसायक नियुक्ती बाबतच्या केंद्रीय निबंधकाच्या पत्राचा आधार घेऊन दौलत साखर कारखाना(thesugarfactory) अवसानयात काढण्याची प्रक्रिया सुरू करावी, अशी मागणी बेळगावचे आमदार अनिल बेनके यांनी केली आहे. पण आता सुरळीत सुरू असलेल्या दौलतच्या कारभाराकडे तुम्ही वक्रदृष्टी का करता, असा सवाल अँड. संतोष मळविकर यांनी प्रसिध्दी पत्रकातून केला आहे

दौलत कारखान्याची(thesugarfactory) संचालक मंडळाची मुदत संपून जवळपास सात वर्षे झाली आहेत. संचालक मंडळ अवैध असेल तरी कारखान्याची संपूर्ण मालमत्ता कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ताब्यात होती. शेतकऱ्यांच्या मागणीवरून बँकेने भाडेतत्त्वावर कारखाना अथर्व इंटरट्रेड प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडे दिला आहे. त्यामुळे कारखान्याची संपूर्ण मालमत्ता अथर्वच्या ताब्यात आहे अथर्वने गेले तीन गळीत हंगाम यशस्वी पूर्ण करून शेतकऱ्यांना योग्य ऊस दर दिला आहे.

जवळपास शंभर कोटी खर्च करून कारखान्याचे आधुनिकीकरण केले आहे तसेच दैनंदिन ७५ हजार लिटर क्षमतेचा इथेनॉल प्रकल्प सुरू केला आहे. या परिस्थितीत अवसायक नियुक्त करून दौलत कारखान्याचे अस्तित्व समाप्त करण्याचे कट कारस्थान कोणीही करू नये, अवसायक म्हणजे कारखाना कायमस्वरूपी संपविणे. त्यामुळे शेतकरी व कामगारांचे नुकसान आहे.

दौलत कारखाना मल्टीस्टेट आहे. त्याचा गैरफायदा घेऊन आमदार बेनके केंद्राकडे अवसायकाची मागणी करून संचालक मंडळांनी बेकायदेशीरपणे अथर्व कंपनीकडे भाडेतत्त्वावर कारखाना दिल्याचे सांगत आहेत. कारखाना भाडेतत्त्वावर देणारे मुख्य पक्षकार जिल्हा बँक आहे. चंदगडचे आमदार राजेश पाटील या बँकेचे संचालक आहेत त्यामुळे त्यांना या संपूर्ण प्रकरणाची माहिती असावी.

चौकट आमदार राजेश पाटील यांनी शिंखडी मागून बाप न मारता उघड भूमिका मांडावी. कारखाना अवसायनात काढल्यावर तो शेतकऱ्यांचा कसा राहणार हेच कळत नाही. आमदार पाटील यांनी सुरळीत असलेल्या कारखान्यात लक्ष न घालता अडचणीत असलेला गडहिंग्लज कारखाना चालवण्यास घेऊन नवा आदर्श निर्माण करुन शेतकऱ्यांचा आशीर्वाद घ्यावा, असे आवाहनही अँड. मळविकर यांनी केली आहे.

आमदार बेनके बेळगाव उत्तरचे आमदार आहेत. त्यांनी संयुक्त महाराष्ट्राचा लढा आठवावा. १०५ हुतात्म्यांचे स्मरण करावे, पोलिसांच्या लाट्या काट्या खाऊन जेल भोगलेल्या असंख्य आंदोलनकर्त्यांची बागावी आपला त्यात काय आहे आणि आपण काय करतोय याची थोडं तरी भान ठेवावे तुमच्याकडे जनतेची फार मोठी मागणी नाही फक्त शिनोळी ते बेळगाव रस्त्याला खड्डे मुक्त करा आणि प्रवाशांना सुखाने प्रवास करून द्या, असा टोला त्यांनी पत्रकात मारला आहे.

हेही वाचा :