…अन् १०० सेकंद कोल्हापूर स्तब्ध झाले!

रयतेचे राजे राजर्षी शाहू छत्रपतींना स्मृती शताब्दीनिमित्त (century) आज कोल्हापुरात अभिवादन करण्यात आले. त्यासाठी कोल्हापुरातील तमाम जनता आज (दि. शुक्रवार) सकाळी १० वाजता १०० सेकंद आहे त्या ठिकाणी स्तब्ध राहिली आणि लोकराजाला तमाम जनतेने मानवंदना दिली.

राजर्षी शाहू छत्रपतींचे यंदाचे स्मृती शताब्दी वर्ष आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीने यानिमित्त लोकराजा कृतज्ञता पर्वाचे आयोजन केले आहे. दि. 18 एप्रिलपासून सुरू झालेले हे पर्व दि. 22 मेपर्यंत सुरू राहणार आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमांद्वारे राजर्षींच्या विचारांचा जागर सुरू आहे. आज राजर्षा शाहू महाराज यांचा स्मृतिदिन. आज सकाळी दहा वाजता शंभर सेकंद आहे त्या ठिकाणी उभे राहून लोकराजाला तमाम जनतेने मानवंदना दिली.(century)

century

शंभर सेकंद कोल्हापूर स्तब्ध
आज ( दि. ६ मे, शुक्रवार) सकाळी दहा वाजता शंभर सेकंद कोल्हापूर स्तब्ध झाले. जिथे असेल त्या जागेवर शंभर सेकंद स्तब्धता पाळून राजर्षींना मानवंदना दिली. शहरातील प्रमुख रस्त्यांवरील नऊ सिग्‍नल या कालावधीत ‘रेड’ झाले. एस.टी. बसेस तसेच अन्य वाहने, जाग्यावर थांबवली गेली.

विविध कार्यालयांतील कर्मचारी, अधिकारी, व्यापारी, उद्योजक, विक्रेते, प्रवासी, शाळा-महाविद्यालये, विद्यापीठातील विद्यार्थी आदी सर्वच नागरिकांनी या उपक्रमात सहभागी होवून लोकराजा राजर्षी शाहू महाराजांना मानवंदना दिली.

हेही वाचा :


भारतात लवकरच लागू होणार 4 दिवसांचा आठवडा?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *