राजेश क्षीरसागर यांचे पोस्टर फाडले, रवी इंगवले यांच्यासह १० जणांवर गुन्हा दाखल!

राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांचे पोस्टर (poster) फाडल्याप्रकरणी शिवसेनेच्या माजी शहर प्रमुख रविकिरण इंगवले यांच्या सह १० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

राजेंद्र जाधव, गुप्तजित उर्फ गुप्ता मोहिते,शैलेश हिरासकर, राकेश माने यांच्यासह अन्य ४ ते ५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद रणजित नारायण जाधव ( वय ४९ रा शिवाजी पेठ) जुना राजवाडा पोलीस ठाण्यात दिली.(poster)

poster

दरम्यान, या संपूर्ण प्रकारामुळे कोल्हापूर शहरातील शिवसेनेमध्ये दुफळी निर्माण झाली. तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. शिवाय राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष माजी आमदार राजेश क्षीरसागर यांच्या कार्यालय व घरासमोर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे.

 

हेही वाचा :


बंडखोर नेत्यांचा राजमार्ग खडतरच, शिंदेंच्या निर्णयावर राजकीय भवितव्य!

Leave a Reply

Your email address will not be published.