कोल्हापूर :पन्हाळा येथील लॉजवर अल्पवयीन मुलीवर बलात्कार!

पन्हाळा तालुक्यातील गुडे येथिल विसावा लॉज (lodge) वर अल्पवयीन मुलीवर लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवले. या प्रकरणी फसवणूक केली असल्याने पीडित मुलीने पन्हाळा पोलिसात धाव घेतली. यामध्ये पवन बाजीराव सुर्वे (वय 20 रा.शिंदेवाडी खुपिरे,ता करवीर) या तरूणास पन्हाळा पोलिसांनी अटक केली आहे.
पन्हाळा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पवन सुर्वे याने त्याच्या लग्नासाठी बायोडाटा आलेल्या अल्पवयीन मुलीस तिला व्हिडिओ कॉलिंग करून तिच्याशी मैत्री वाढवली. नंतर लग्नाचे आमिष दाखवून घरातील कोणासही काहीही न सांगता घरातील सोन्याचे दागिने, आधारकार्ड घेऊन येण्यास सांगितले. पीडीत मुलगी आल्यानंतर तिला फूस लावून गुडे तालुका पन्हाळा येथील विसावा लॉज (lodge) वर नेऊन तिच्या मनाविरुद्ध तिच्यावर जबरी संभोग केला.
या नंतर तिला घेऊन कोल्हापूर येथील शिवाजीपुलावर आला व मुलीच्या घरी फोन करून तुमची मुलगी शिवाजी पुलावर जीव देण्यासाठी आली आहे, मी तिला जीवदेण्यापासून परावृत्त केले आहे. आणि तिला आसुरले पोरले येथे घेऊन येतो तेथुन तिला घेऊन जा असे सांगितले. आणि आसुरले पोरले येथे नेऊन मुलीला नातेवाईकांना हवाली केले. घरी गेल्या नंतर मुलीच्या आईने मुलीस तू जीव देण्यासाठी का गेली होती? असे विचारले नंतर मुलीने घडलेला प्रकार आई वडिलांना सांगितला.
आई वडिलांच्या मुलाच्या घरी ही बाब सांगितली. मुलाच्या घरच्या लोकांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. आपल्या मुलीची फसवणूक झाली असल्याचे लक्षात आल्याने पन्हाळा पोलिसात पवन सुर्वे याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर शनिवार (दि.23) रोजी आरोपीला कोल्हापूर जिल्हासत्र न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यास 26 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
हेही वाचा :