कोल्हापूर : संजय पवार यांच्याकडे ‘इतक्या’ कोटींची मालमत्ता !

राज्यसभेसाठीचे शिवसेनेचे दुसरे उमेदवार संजय पवार यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात 56 लाख 19 हजार रुपयांची जंगम (property) मालमत्ता, तर 39 लाख 99 हजार रुपयांची स्थावर मालमत्ता असल्याचे नमूद केले आहे, तर पत्नीकडे 47 लाख 29 हजार रुपयांची स्थावर मालमत्ता असल्याचे स्पष्ट केले आहे. सध्याच्या बाजारभावानुसार संजय पवार यांच्या मालमत्तेची किंमत 2 कोटी 72 लाख आहे. त्यांच्याकडे 18 कोटी रुपयांची कोल्हापूर येथे शेतजमीन आहे.

संजय पवार यांच्यावर 47 लाख 67 हजार रुपयांचे कर्ज आहे. त्यांच्याकडे 12 लाख रुपयांचे दागिने, तर पत्नीकडे 33 लाख रुपयांचे (property) दागिने आहेत. पवार यांनी नागाळा पार्क येथे कमर्शिअल जागा 35 लाख रुपयांना खरेदी केली आहे. त्याची सध्याची बाजारभाव किंमत 2 कोटी 44 लाख आहे. त्यांच्या बँक खात्यात 6 लाख 71 हजार रुपये असल्याचे त्यांनी प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे.

हेही वाचा :


बोनी कपूर यांच्या क्रेडिट कार्डमधून लाखोंची रक्कम लंपास!

Leave a Reply

Your email address will not be published.