कोल्हापुरातील खळबळ जनक बातमी ! विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ..!

कोल्हापुरातील (kolhapur) मंगळवार पेठे इथल्या महानगरपालिकेच्या शाळेत पोषण आहारातील (nutrition diet) खिचडीच्या भातात आळ्या सापडल्याची खळबळजनक घटना घडली आहे. अहिल्याबाई होळकर प्राथमिक विद्यालयात ही घटना घडली असून सदरची बाब सातवीच्या विद्यार्थिनीच्या लक्षात आल्याने एकच खळबळ उडाली.
मंगळवार पेठेतील अहिल्याबाई होळकर प्राथमिक विद्यालयात बुधवारी खिचडीच्या भातात एका विद्यार्थिनीला आळ्या सापडल्या. तिने हा प्रकार मुख्याध्यापकांना सांगितला. याबाबतची माहिती महापालिका अधिकारी आणि पालकांना मिळताच उपायुक्त शिल्पा दरेकर, सहाय्यक आयुक्त विद्या पोळ, मनपा शिक्षण प्रशासन अधिकारी डी.सी कुंभार यांच्यासह तक्रारदार अंजुम देसाई यांनी शाळेत येऊन पाहणी केली.या शाळेतील जेवणाचे कंत्राट हे मनपा शिक्षण प्रशासन अधिकारी डी.सी कुंभार यांनी सांगलीच्या नीलाक्षी बचत गटाला दिला होता. यामुळे कार्यकर्त्यांनी कुंभार यांना धारेवर धरले. या घटनेचा सहाय्यक आयुक्त विद्या पोळ यांच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात आला.
दरम्यान, याप्रकरणी कोल्हापूर शालेय पोषण आहार संघटना आक्रमक झाली आहे. शालेय पोषण आहार (nutrition diet) संघटनेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी आज घटनास्थळी भेट घेऊन महापालिकेच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला आहे, हे कंत्राट तात्काळ रद्द करावे आणि विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ बंद करावं असंही त्यांनी यावेळी म्हटले.
तर, महापालिकेच्या प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेतली असून सहाय्यक आयुक्त विद्या पोळ यांच्या पथकाने घटनेचा पंचनामा केला आहे. ज्या ठेकेदारामार्फत हा शालेय पोषण आहाराचा पुरवठा झाला आहे त्याने कोल्हापूर जिल्ह्यातल्या 12 हजार विद्यार्थ्यांना आज आळ्या मिश्रित पोषण आहार दिल्या गेल्याचं समोर आला आहे. त्यामुळे 12 हजार विद्यार्थ्यांचा अगोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. याप्रकरणी तक्रारदाराने ही आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. एकूणच या प्रकाराची चौकशी महापालिकेच्या शिक्षण विभागाने सुरू केली आहे. या चौकशीत विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळणाऱ्या संस्थेवर नेमकी काय कारवाई होते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
हेही वाचा :