कोल्हापुरात शिवसैनिक आक्रमक, राजेश क्षीरसागरांचे पोस्टरवरील फोटो फाडले!

शिवसेना नेते, मंत्री एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. शिवसेनेत दोन गट पडल्याने शिंदे गटात सामील झालेल्या आमदारांविरोधात शिवसैनिक संतापले आहेत. अनेक ठिकाणी बंडखोर आमदारांच्या पोस्टरला (poster) काळे फासणे, कार्यालयावर दगडफेकीच्या घटना घडल्या आहेत.
कोल्हापुरातही संतप्त शिवसैनिकांनी माजी आमदार, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर हे एकनाथ शिंदे गटात सामील झाल्याने शिवाजी पेठेतील शिवसेनेच्या शाखेतील फलकावरील त्याचे फोटो (poster) फाडले. यामुळे शहरातील वातावरण तणावपुर्ण बनले आहे.
माजी नगरसेवक रविकिरण इंगवले यांनी त्यांच्या समर्थकांनी राजेश क्षीरसागर यांचे फोटो फाडले. यावेळी ‘शिवसेना अंगार है, बाकी सब भंगार है ’ अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी इंगवले यांनी क्षीरसागर यांच्यावर हल्लाबोल केला.
पक्षाने मंत्रिपद दिले, वैभव दिले. हे सर्व देऊनही बकासूर राक्षसा सारखी भूक असणाऱ्या क्षीरसागर यांचा अहंकार जिरवू. पक्षाच्या नावावर गब्बर झालेल्यांना धडा शिकवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असा इशारा दिला.
हेही वाचा :