शिवसेना उपनेत्या डॉ.नीलम गोऱ्हे आज कोल्हापुरात

Navratri

“बये दार उघड मोहिम”

कोल्हापूर: दि.२८(बी.टी.एन.प्रतिनिधी) नवरात्री(Navratri)निमित्ताने शिवसेनेची महिला आघाडी आणि युवासेना पदाधिकारी यांची सुरू झालेली ‘ बये दार उघड मोहिम ‘ आज दि.२९ सप्टेंबर रोजी कोल्हापुरात येत आहे.यानिमित्ताने शिवसेना उपनेत्या डॉ.नीलम गोऱ्हे आज गुरुवारी कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत(Navratri).

दुपारी दोनच्या सुमारास शासकीय विश्रामगृह येथे कार्यकर्त्यांच्या भेटी तसेच पत्रकारांशी संवाद साधल्यानंतर,करवीर निवासिनी श्रीअंबाबाई मंदिर परिसरात दुपारी तीन च्या सुमारास या मोहिमेची ज्योत स्थानिक शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत प्रज्वलित करण्यात येणार आहे.
दरम्यान शुक्रवार,दि.३० सप्टेंबर रोजी पंढरपूर मध्ये दुपारी श्रीविठ्ठल-रुक्मिणी मंदिरांत दर्शन घेऊन, सोलापूरला शासकीय विश्रामगृहावर दुपारी कार्यकर्त्यांशी व पत्रकारांशी संवाद साधण्यात येणार आहे. दुपारी ४.१५ नंतर तुळजापूर आणि सायंकाळी बीडकडे प्रयाण करणार आहेत.

 

Smart News:-