अबब… !कोल्हापूरच्या ‘या’ पतसंस्थेत सव्वा कोटींचा अपहार..!

शनिवार पेठेतील सोन्या मारुती नागरी (credit union) पतसंस्थेतील एक कोटी ३१ लाखांहून अधिकच्या अपहारप्रकरणी लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात सहा जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला. अध्यक्ष, व्यवस्थापक, रोखपालासह तिघा प्रमाणित लेखापरीक्षकांचा यामध्ये समावेश आहे. पैकी संस्था अध्यक्षास अटक केल्याचे पोलिसांनी सांगितले. याबाबतची फिर्याद शासकीय विशेष लेखापरीक्षक अनिल पैलवान यांनी दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
गुन्हा दाखल झालेल्या संशयितांमध्ये (credit union) संस्थेचे अध्यक्ष सुनील आनंदराव पाटील (रा. शनिवार पेठ), व्यवस्थापिका अनिता अनिल पोवार (रा. साळोखेनगर), रोखपाल राजेंद्र खंडेराव पाटील (रा. फुलेवाडी), प्रमाणित लेखापरीक्षक एम. एस. पाटील, श्रीकांत मा. घोरपडे आणि एम. एस. कळसकर यांचा समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी सांगितले, की अनिल पैलवान शासकीय विशेष लेखापरीक्षक आहेत. त्यांनी शनिवार पेठेतील सोन्या मारुती नागरी सहकारी पतसंस्थेचे १ एप्रिल २०१४ ते ३१ मार्च २०१९ या कालावधीचे लेखापरीक्षण केले.
अध्यक्ष पाटील, व्यवस्थापिका पोवार, रोखपाल पाटील तर लेखापरीक्षक पाटील, घोरपडे, कळसकर आहेत. पहिल्या तिघा संशयितांनी ठेवीदारांच्या ठेवीचे व्यवस्थित नियोजन करणे आवश्यक होते; पण त्यानी संगनमताने संस्थेच्या रकमेचा अपहार करण्याच्या उद्देशाने रोख शिल्लक चुकीची दाखवून, बचत खात्याची रक्कम बोगस खर्ची दर्शवून, अपहार लपविण्याच्या दृष्टीने संस्थेच्या इमारतीचे मूल्यांकन वाढवले.
ठेवीदारांना व्याज दिल्याचे खोटे दर्शवून, लाभांश दिल्याच्या खोट्या नोंदी केल्या. बंद पडलेल्या संस्थेत गुंतवणूक केल्याचे दर्शवून आणि खोटी कागदपत्रे तयार करून एक कोटी ३१ लाख ६७ हजार १५४ रुपये ६७ पैशांचा अपहार केला. इतर संशयितांनी त्याकाळात लेखापरीक्षण केले. दरम्यान, अपहार माहीत असतानादेखील चुकीचे लेखापरीक्षण केले, असे पैलवान यांनी फिर्यादेत म्हटले आहे.
हेही वाचा :