मजूर संघात सात वर्षानंतर सत्तांतर

मुकुंद पोवार यांचे निर्विवाद वर्चस्व : १५ पैकी १४ जागा जिंकल्या

Smart News:- अत्यंत चुरशीने झालेल्या व संपुर्ण जिल्हयाचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर जिल्हा मजूर सहकारी संघाच्या निवडणूकीत सत्तारुढ गटाचा दारुण पराभव करत विरोधी आघाडीने १५ पैकी १४ जागा जिंकत सत्तांतर घडविले. सत्ताधाऱ्यांच्या सात वर्षाच्या सत्तेला सुरुंग लावत मुकुंद पोवार यांनी संस्थेवर निर्विवाद वर्चस्व मिळविले. सत्तारुढ गटाचे नेते व विद्यमान चेअरमन भिमवराव नलवडे, उदय जोशी, सम्राटसिंह पाटील यांना पॅनेलसह स्वत:चाही पराभव वाचविता आला नाही. निकाल जाहीर होताच विजयी गटाच्या समर्थकांनी गुलालाची उधळण करत जल्लोष केला.

मजूर संघाच्या पंचवार्षिक निवडणूकीसाठी बुधवारी सकाळी ८ ते ४ वाजेपर्यंत मतदान झाले. २९७ पैकी तब्बल २९६ इतके म्हणजे ९९ टक्के मतदान झाले. मतदारांनी रांगा लावल्याने पहिल्या दोन तासातच मतदान पुर्ण झाले. सायंकाळी ५ वाजता मतमोणी करण्यात आली. यामध्ये विरोधी गटाने निर्विवाद वर्चस्व मिळविले. सत्तारुढ गटाचे तानाजी पोवार हे एकमेव विजयी झाले.

विजयी उमेदवार व कंसात त्यांना मिळालेली मते अशी,

सर्वसाधारण गट : लक्ष्मण तोडकर (१५४), प्रमोद पोवार (१५२), जयहिंद तोडकर (१४७), जयसिंग पाटील १४७, शिरीष करंबे १४६, तुकाराम पाटील १४५, शाहू काटकर १४५, उषा पाटील १४४, किर्ती मोरे १४३, वसुंधरा पाटील १४३,

ओबीसी गट : युवराज पाटील १५३,

महिला राखीव गट : पद्मजा कदम १५९, शर्मीला शिंगाडे १४७,

अनुसुचित जाती- जमाती : राहूल आवळे १५३,

विमूक्त जाती भटक्या जमाती : तानाजी पोवार १४८,

निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून हातकणंगलेच्या उपनिबंधक डॉ. प्रगती बागल व सहायक निवडणूक अधिकारी म्हणून एस. व्ही. मसूरकर यांनी काम पाहीले.

 

Smart News:-

इचलकरंजीतील घरफोडीचा गुन्हा उघड


इचलकरंजी MSCB चा मनमानी भोंगळ कारभार


आता गाडीवर ‘पोलीस’ लिहिणं पडणार महागात.


‘गंगुबाई काठियावाडी’ नंतर ‘या’ चित्रपटांतून प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आलियाच्या अभिनयाची जादू


Holi, धुलीवंदनासाठी राज्य सरकारची नियमावली जारी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *