कोल्हापुरात काँग्रेस-भाजप यांच्यात चुरशीची लढत, शिवसेनेचा अलिप्त राहण्याचा निर्णय

Smart News:- कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपने आपला अधिकृत उमेदवार जाहीर केला आहे. काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव (Chandrakant Jadhav) यांचे गेल्यावर्षी निधन झालं होतं. त्यामुळे कोल्हापूर उत्तर विधानसभेची जागा रिक्त आहे. या जागेवर खरंतर सत्ताधारी पक्ष बिनविरोध निवडणुकीसाठी प्रयत्न करत होते. पण भाजपने या निवडणुकीत उतरण्याचा निश्चय केला आहे.
भाजपने पोटनिवडणुकीसाठी उमेदवाराचे अधिकृत नावही जाहीर केले आहे. भाजपने या निवडणुकीसाठी सत्यजित (नाना) शिवाजीराव कदम (Satyajeet Kadam) यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे आता ही दुहेरी लढत राहणार आहे. काँग्रेसकडून जयश्री जाधव यांना उमेदवारी काँग्रेसचे दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनामुळे गेल्या वर्षभरापासून कोल्हापूर उत्तर विधानसभेची जागा रिक्त आहे.
या जागेवर बिनविरोध निवडणूक व्हावी, असा सत्ताधारी पक्षाचा मानस आहे. पण याआधीच्या राज्यातील झालेल्या पोटनिवडणुका पाहता कोल्हापूर उत्तर मतदारसंघात पुन्हा निवडणुकीची रणधुमाळी बघायला मिळणार आहे. या मतदारसंघात काँग्रेसची सत्ता होती. त्यामुळे महाविकास आघाडीकडून काँग्रेस उमेदवाराला संधी दिली जाणार आहे.
विशेषत: या निवडणुकीसाठी काँग्रेसचे दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री यांना उमेदवारी दिली जाणार आहे. तर भाजप त्यांच्या एका उमेदवाराला संधी देईल. अशी एकंदरीत ही दुहेरी लढत असणार आहे. शिवसेनेची नेमकी भूमिका काय? दरम्यान, या निवडणुकीत शिवसेनादेखील आपला उमेदवार उभं करणार होती.
पोटनिवडणुकीची घोषणा झाल्यानंतर शिवसेना निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा रंगली होती. पण शिवसेनेची समजूत काढण्यात काँग्रेसला यश आल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे या निवडणुकीत काँग्रेस-भाजप यांच्यात थेट लढत होणार आहे.
आम आदमी पक्ष महाराष्ट्रात एन्ट्रीच्या तयारीत नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने पंजाबमध्ये दमदार एन्ट्री करत एकहाती सत्ता मिळवली. तर गोव्यातही आपले आमदार निवडून आणण्यात यश मिळवलं आहे. त्यानंतर आता आम आदमी पक्ष कोल्हापूर उत्तर विधानसभेच्या पोटनिवडणुकीत उडी घेऊन महाराष्ट्रात एन्ट्री करण्याच्या तयारीत आहे. कोण असणार उमेदवार? आम आदमी पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रंगा राचुरे हे कोल्हापुरात दाखल झाले आहेत.
दोन दिवसांपूर्वीच त्यांनी या निवडणुकीत आपण उमेदवार देणार असल्याचं जाहीर केलं होतं. त्यामुळे आज-उद्यामध्ये आम आदमी पक्षाकडून कोल्हापुरच्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवार जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीचा कार्यक्रम कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी 12 एप्रिलला मतदान तर 16 एप्रिलला मतमोजणी केली जाणार आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी 24 मार्च ही शेवटची तारीख आहे.
Smart News:-
‘या’ दिवशी पृथ्वीच्या जवळून जाणार महाकाय उल्का! पृथ्वीला धोका आहे का? शास्त्रज्ञ म्हणतात..
Apple Watch : ऍपल वॉचने वाचवला डेंटिस्टचा जीव, पत्नीकडून ऍपलचे आभार
Perfect learning : काळानुसार बदलणारे टप्पे
अवघ्या 38 हजारात खरेदी करा Honda Activa..!