सैन्यातील अधिकाऱ्यावरच जातपंचायतीचा बहिष्कार, कोल्हापुरातील धक्कादायक प्रकार

Smart News:- सैन्यातील अधिकाऱ्यावरच जातपंचायतीचा बहिष्कार, कोल्हापुरातील धक्कादायक प्रकार

Smart News:- शिरोळ तालुक्यातील हेरवाड गावाने विधवा प्रथेला बंदी घालण्याचा क्रांतीकारी निर्णय घेतल्याने कोल्हापूर जिल्ह्याचा राज्यात डंका वाचला. राज्यशासनाने याची दखल घेत सर्वच ग्रामपंचायतीने हा ठराव मांडावा आणि ही प्रथा बंद करावी असा आदेशच काढला.

पुरोगामी म्हणून ओळख असलेल्या याच कोल्हापूर जिल्ह्यात एकीकडे रुढी परंपराना छेद दिला जात असतानाच एक धक्कादायक बाब समोर आली आहे. सैन्य दलातील अधिकाऱ्याच्या घरावरच बहिष्कार टाकून त्याना समाजातून बहिष्कृत केल्याची घटनी समोर आल्याने खळबळ उडाली आहे.

खासदारांचेच गाव असलेल्या रुकडी गावात हा प्रकार घडला आहे. येथील धनगर समाजातील सैन्यदलातील अधिकारी देवेंद्र शिणगारे यांच्यावर जातपंचायतीने बहिष्कार टाकून समाजातून बहिष्कृत केले आहे. याबाबत पोलीस अधीक्षकांकडे कैफियत मांडूनही न्याय मिळत नसल्याचे पीडित कुटुंबियांनी ‘लोकमत’ला सांगितले.

..म्हणून शिणगारे कुटुंबियांवरही बहिष्कार

रुकडी येथील जातपंचायतीने समाजातील काही कुटुंबांवर बहिष्कार टाकला होता. बहिष्कार टाकलेल्या कुटुंबाबरोबर सैन्यदलातील अधिकारी देवेंद्र शिणगारे संबंध ठेवतात व त्यांच्याबरोबर रोजीरोटीचा व्यवहार करतात, म्हणून गेली तीन वर्षे याही कुटुंबावर बहिष्कार टाकण्यात आला. तर या पीडित कुटुंबांवर मनमानीप्रमाणे निर्बंध लादणे, दंड, शिवीगाळ, मारहाण करणे अशी कृत्ये करत, समाजात दहशत निर्माण केली जात आहे.

गेली २८ वर्षे जातपंचायतीचा बहिष्कार

तक्रारीमध्ये तक्रारदाराने मंदिरामध्ये प्रवेश केल्यास जिवे मारण्याची धमकी देणे, देवाची पूजा करू न देणे, तक्रारदार कुटुंबाबरोबर कोणी संपर्क केल्यास पीडित कुटुंबांना धमकावले जात. समाजातील काही कुटुंबांवर गेली २८ वर्षे जातपंचायतीने बहिष्कार टाकला आहे. गुंडगिरी व सामाजिक पिळवणूक होत असलेल्या कुटुंबातील व्यक्ती भीतीपोटी बोलत नसून अशा गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तीविरोधात कारवाई करावी, अशी मागणी पीडितांनी लेखी केली आहे.

राजकीय पाठबळ

या प्रकाराला राजकीय पाठबळ मिळत आहे. त्यापेक्षा दुर्दैव म्हणजे हातकणंगले पोलीस स्टेशनकडे तक्रार करूनही त्याची दखल घेतली जात नसल्याची खंत व्यक्त करून पुरोगामी जिल्ह्यात अशी घटना काळिमा फासणारी असल्याचे मत सैन्याधिकारी देवेंद्र शिणगारे यांनी व्यक्त केले.

Smart News:-

मुंबई : सीजन हॉटेलमध्ये 7 वर्षांच्या मुलीचा कुजलेला मृतदेह


24 तासात ठार मारू, रुपाली चाकणकर यांना फोनवरून धमकी


खासदार गजानन कीर्तीकर आरोपांत काही तथ्य नाही : हसन मुश्रीफ


रूपाली भोसलेची ऑनस्क्रीन सासऱ्यांसाठी खास पोस्ट…


फोटो पाहून तरुणाने केलं लग्न; चेहऱ्यावरील ओढणी हटवताच हादरला


 

Leave a Reply

Your email address will not be published.