गणेश विसर्जन दिवशी मलकापूर नगर परिषदेच्या वतीने विशेष मोहीम

गणेश उत्सव कालावधी बरोबरच  गणेश विसर्जन दिवशी मलकापूर नगर परिषदेच्या वतीने विशेष मोहीम (campaign ad)राबवली ज्यामुळे पर्यावरणपूरक गणेश उत्सव साजरा केल्याने गणेश उत्सव काळात विविध उपक्रम राबवने अतिशय सोयीचे ठरले व मंडळाच्या बरोबरच सर्वच नागरिकांच्यात जागृती करण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान ठरले असल्याच समोर आल आहे.

मलकापूर नगरपरिषदेच्या वतीने पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी  प्रशासक (campaign ad)तथा मुख्याधिकारी श्रीमती. विद्या कदम  यांच्या मार्गदर्शना नुसार  शहरातील विविध सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांनी मोठ्या उत्साहात मंगळवार पेठ येथिल पाणवठ्यावर गणेश मूर्तींचे विसर्जन केले.  मलकापूर नगरपरिषदेच्या वतीने मलकापूर नगरपरिषद कार्यालयासमोर  स्वागत कक्ष उभारण्यात आला होता. यावेळी नगरपरिषद प्रशासना मार्फत सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांचे श्रीफळ, फेटे व हार देऊन स्वागत तसेच पर्यावरण पूरक पद्धतीने गणेश मूर्तींचे विसर्जन करण्या करिता आवाहन  करण्यात आले.

शहरातील गणेश विसर्जन मिरवणूक  13 तास चालली या दरम्यान  शहरातील 16 गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. शासनाच्या आदेशानुसार रात्री 12 वाजता मिरवणुकीतील सर्व मंडळांनी डॉल्बी सिस्टिम्स बंद करून प्रशासनास सहकार्य केले.शहरातील सार्वजनिक मंडळांनी उत्सवात तयार झालेले एकूण निर्माल्य (50 किलो) देखील दान केले असून नगरपालिकेच्या वतीने  त्याची पर्यावरण पूरक पद्धतीने हाताळणी करून त्यापासून खत निर्मिती केली जाणार आहे.

हेही वाचा :