कोल्हापूर: राज्य काँग्रेस प्रदेश प्रतिनिधी पदी गोपाळराव पाटील

state representative

चंदगड: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या प्रदेश प्रतिनिधीपदी (state representative) कोल्हापूर जिल्हयातून चंदगड तालुक्यातील काँग्रेसचे नेते गोपाळराव पाटल यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे. कोल्हापूरचे माजी पालकमंत्री काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांनी त्यांच्या निवडीची शिफारस केली.

प्रदेश निवडणूक अधिकारी पल्लम राजू यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या नवनिर्वाचित प्रदेश प्रतिनिधींची (state representative) बैठक नुकताच यशवंतराव चव्हाण सभागृहात पार पडली. या बैठकीला प्रदेश प्रभारी एच. के. पाटील, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी मंत्री आ.बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.

या निवडीमुळे चंदगड तालुक्यातील नेत्याला राज्यातील कमिटीमध्ये स्थान मिळाल्याने पक्ष वाढीसाठी याची निश्चित मदत होऊ शकते असे मत तालुकाध्यक्ष संभाजीराव शिरोलीकर, विलास पाटील यांनी लोकमत शी बोलताना व्यक्त केले.

 

Smart News:-