कोल्हापूरमध्ये काल तरूण तर आज तरूणीची आत्महत्या

कोल्हापूर जिल्ह्यात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या आत्महत्येच्या (suicide case)  प्रमाणात वाढ होताना दिसत आहे.  मागच्या 48 तासांता कोल्हापूरमध्ये दोघांनी आत्महत्या केली आहे. दरम्यान मागच्या महिन्यात एका वैद्यकिय शिक्षण घेणाऱ्या तरूणीने आत्महत्या केली होती.

तर शिरोळ तालुक्यातील दत्तवाड येथील तरूणाने मागच्या 2 दिवसांपूर्वी आत्महत्या (suicide case) केल्याची घटना ताजी असताना काल शुक्रवारी राजेंद्रनगर येथील कॉलेज तरुणीने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली.

यातच आता, साक्षी सचिन शिवशरण (वय 17) असे तिचे नाव आहे. शुक्रवारी सकाळी ही घटना घडली. बारावी उत्तीर्ण झालेल्या साक्षीने पुढील शिक्षणासाठी महाविद्यालयात प्रवेश घेतला होता. सकाळी दहा वाजता साक्षी आई, बहीण व लहान भावांशी गप्पा मारून दुसऱ्या मजल्यावरील खोलीत गेली. लोखंडी अँगलला दोरीने गळफास घेऊन तिने आत्महत्या केली. हा प्रकार निदर्शनास येताच कुटुंबीय, नातेवाईकांनी आक्रोश केला. राजारामपुरी पोलिस ठाण्यात घटनेची नोंद झाली आहे. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. तिने टोकाचे पाऊल उचलल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Smart News :


हर घर तिरंगा : तुमच्या घरावर झेंडा फडकावणार असाल, तर ‘या’ 10 गोष्टी लक्षात ठेवा

Leave a Reply

Your email address will not be published.