अभिमान! कोल्हापूरची कन्या करणार भारताचे प्रतिनिधित्व..!

मुलींच्या १४ वर्षाखालील आय. टी. एफ. वर्ल्ड ज्युनिअर टेनिस चॅम्पियनशीप (tennis championships) फायनल क्वालिफाईंग स्पर्धेसाठी भारताचे प्रतिनिधित्व करण्‍यासाठी कोल्हापूरमधिल  ऐश्वर्या जाधव, ओरिसची सोहिनी मोहंटी, बेंगलोरची साई जानवी, पुण्याची नमिता बाल यांची निवड करण्यात आली आहे.

आय. टी. एफ. वर्ल्ड ज्युनिअर टेनिस चॅम्पियनशीप (tennis championships) फायनल क्वालिफाईंग स्‍पर्धा आर. के. खन्ना टेनिस स्टेडियम नवी दिल्ली येथे आयोजित करण्‍यात आली आहे. १८ ते २३ एप्रिल 2022 या कालावधीत ही स्‍पर्धा पार पडणार आहेत. या स्पर्धेमध्ये भारत, ऑस्ट्रेलिया, चीन, जपान, लिबनान, मलेशिया, सिंगापूर, श्रीलंका, उझबेगिस्तान, नेपाळ, थायलंड, इराण, कोरिया, कझाकीस्थान अशा 14 देशातील खेळाडूंचा समावेश असून या स्पर्धेसाठी भारताचे प्रतिनिधित्व कोल्हापूरची ऐश्वर्या जाधव, ओरिसची सोहिनी मोहंटी, बेंगलोरची साई जानवी, पुण्याची नमिता बाल यांची निवड करण्यात आली आहे. नमिता बाल ही या टीमची कॅप्‍टन आहे.

tennis championships

ऐश्वर्या जाधव छत्रपती शाहू विद्यालय कोल्हापूरची विद्यार्थिनी असून, ती कोल्हापूर जिल्हा लॉन टेनिस असोसिएशन अर्शद देसाई टेनिस अकादमी येथे प्रशिक्षण घेत आहे. प्रशिक्षक मनाल आणि अर्शद देसाई यांचे तिला प्रशिक्षण लाभले आहे. ऐश्वर्या जाधव हिला निलाभ गोएंका रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर इव्हॉल्व्ह ग्रुपचे सहकार्य लाभले आहे.

हेही वाचा :


गरोदर असतानाच लोकप्रिय गायिकेचा बॉयफ्रेंडकडून विश्वासघात!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *