इचलकरंजी: मंत्री चंद्रकात दादा पाटील घेणार बैठक

Textiles Minister

स्मार्ट इचलकरंजी | वृत्तसेवा: यंत्रमाग उद्योगाचे प्रश्न सोडविण्यासाठी येत्या काही दिवसात बैठक घेण्यात येईल अशी ग्वाही वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांतदादा पाटील(Textiles Minister) यांनी दिली.

इचलकरंजी येथेआयोजित यार्न एक्स्पो च्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते.

मंत्री पाटील म्हणाले, महाराष्ट्राचं मॅचेस्टर म्हणून उल्लेख होणार्‍या या शहराने आणखी नियोजन केल्यास शहर आणखी पुढं जाऊ शकतं .रोजगार निर्मीतीचं मोठं केंद्र असलेल्या या शहरातील उद्योगाच्या अडचणी सोडवण्यासाठी शासन नक्की मदत करेल. इचलकरंजीतील व्यवसायानं आणखीन गती घेण्याची गरज आहे. अनुदानानं माणुस अपंग होतो. त्यामुळं रोजगार वाढीसाठी शासन प्रयत्नशिल आहे. वस्त्रोद्योगाला स्थिर स्थावर होण्यासाठी वीज दरात सवलत आणि कापूस स्वत मिळणं गरजेचं आहे. एकुणच उद्योगासमोरील अडचणी सोडवण्यासाठी लवकरच मंत्रालयात बैठक घेऊन उद्योगाला गती देऊ(Textiles Minister).

मनमोहन सिंग म्हणाले, देशातील टेक्स्टाईल हबमध्ये इचलकरंजीचा समावेश आहे. इथला उद्योग गतीनं वाढत असून देशाच्या एकुण सुताच्या मागणीपैकी 4 टक्के मागणी इचलकरंजीची आहे. यामध्ये दिवसेंदिवस वाढच होत आहे. एकाच ठिकाणी वस्त्रोद्योगातील सर्व प्रक्रिया झाल्या तर वेळेची बचत होईल आणि उत्पादनाची गुणवत्ताही सुधारते. त्यामुळं उद्योग वाढीसाठी आवश्यक ते सहकार्य करु आमदार प्रकाश आवाडे म्हणाले,प्रोसेसचे तीनचतुर्थांश सांडपाणी ओढ्यावाटे नदीला मिसळत असल्यानं प्रदुषणाचा प्रश्‍न निर्माण होतो. मात्र प्रोसेसवाले गेंड्याच्या कातडीचे आहेत.उद्योग जगविण्यासाठी माणसे मारून चालणार नाहीत(Textiles Minister). औद्योगिक सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याच्या प्रकल्पाबाबत ठोस निर्णय घेणं गरजेचं आहे. उद्योगासमोरील अडचणी सोडवण्यासाठी शासनानं मदत केल्यास वर्षाला 50 हजार कोटीची निर्यात करून दाखवु,
असोसिएशनचे अध्यक्ष अनिल गोयल यांनी स्वागत केले.अरुणकुमार गोयंका यांनीही मनोगत व्यक्त केले.गोरखनाथ सावंत यांनी आभार मानले.

Smart News:-