कोल्हापूर : कुरुंदवाड येथे रात्रीत सात ठिकाणी चोरी!

येथील दौलतशहा भाजीपाला मार्केट (vegetable market) येथे एका रात्रीत सात ठिकाणी दुकाने फोडून चोरट्यांनी 20 हजार रुपये रोकड,गॅस सिलेंडर व दुकानातील अन्य साहीत्य असा एक लाखांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेला आहे.

दौलतशहा भाजीपाला मार्केट (vegetable market) येथे बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी जावेद बागवान, अबिदअली बागवान, पिंटू पटाईत, शब्बीर दानेकर, बबलू पठाण, जहांगीर नालबंद, इनुस बागवान, रीयाज वर्गी या व्यापाऱ्यांच्या दुकानाच्या शटरचे कुलूप उचकटून दुकानात प्रवेश केला.

जावेद बागवान व विज बागवान यांच्या कपाटाचा दरवाजा उचकटून वीस हजार रुपये रोख रक्कम चोरून नेली आहे. इतर व्यापाऱ्यांच्या दुकानातील गॅस सिलेंडर, स्टील पाईप,स्टेशनरी साहित्य चोरुन नेल्याचा प्रकार आज सकाळी उघडकीस आला.

पंधरा दिवसांपूर्वी जुन्या भाजीपाला मार्केटमधील फ्रुटचे दुकान व जनरल स्टोअर्सच्या दुकानात चोरी झाली होती. शहरात चोरीचे प्रमाण वाढले असून चोरट्याना जेरबंद करण्याचे पोलीस प्रशासनासमोर आवाहन आहे. या प्रकरणी संशयास्पद म्हणून अल्पवयीन मुलास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. चोरीमुळे शहरात खळबळ माजली असून, व्यापाऱ्यातून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

हेही वाचा :


देवेंद्र फडणवीस ‘नॉटरिचेबल’, राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण!

Leave a Reply

Your email address will not be published.