कोल्हापूरच्या कस्तुरीने सर केले एव्हरेस्ट शिखर

कोल्हापूर : कोल्हापूरच्या कस्तुरी दिपक सावेकर हिने शनिवार १४ मे २०२२ रोजी जगातील सर्वोच्च शिखर ‘माऊंट एव्हरेस्ट‘(Mount Everest) सर केले.
ही कामगिरी करून कस्तुरीने कोल्हापूरच्या इतिहासात मानाचा तुरा रोवला. सकाळी सहा वाजता कस्तुरीने ही किमया साधली. शिखरमाथ्यावर उभी राहून भारताचा तिरंगा आणि छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा असणारा भगवा झेंडा फडकवत कस्तुरीने एक फोटो काढून घेतला. ‘माऊंट एव्हरेस्ट(Mount Everest)’ सर करून कस्तुरीने एक स्वप्न साकार केले. ही कामगिरी करणारी कस्तुरी ही कोल्हापूरची पहिली व्यक्ती आहे. कस्तुरीसोबत वीस जणांच्या तुकडीने एव्हरेट सर केले. या तुकडीत कस्तुरी ही एकमेव भारतीय आहे.
कस्तुरीला बालपणापासून गडकिल्ल्यांवर जाण्याची हौस होती. अनेक कठीण कडे सहज चढून गेलेल्या कस्तुरीने एव्हरेस्टच ध्यास घेतला. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कस्तुरीने मागच्या वर्षी प्रयत्न केला. पण प्रतिकूल वातावरणामुळे तिला प्रयत्न अर्ध्यावर सोडावा लागला. यंदाच्या वर्षी मात्र कस्तुरीने स्वप्न पूर्ण केले.
आर्थिक परिस्थिती नसतानाही कस्तुरीच्या वडिलांनी तिच्या मोहिमेसाठी खर्च उभा केला. यानंतर २४ मार्चला कस्तुरी रवाना झाली. तिने २८ एप्रिलला अन्नपूर्णा शिखर सर केले आणि ४ मे रोजी एव्हरेस्टचा(Mount Everest) बेस कॅम्प गाठला. सोमवार ९ मे रोजी चढाई सुरू करून कस्तुरी १२ मे रोजी बेस कॅम्प ३ येथे पोहोचली. शुक्रवारी रात्री शेवटची चढाई सुरू करत शनिवारी सकाळी कस्तुरीने स्वप्न पूर्ण केले. कस्तुरी ही अन्नपूर्णा शिखर सर करणारी पहिली तरुण गिर्यारोहक झाली तसेच ‘माऊंट एव्हरेस्ट’ सर पहिली कोल्हापूरची व्यक्ती झाली. कस्तुरीने हे यश राजर्षी शाहू महाराजांना समर्पित केले.
IPL सट्टेबाजी आणि मॅच फिक्सिंगचा थेट पाकिस्तानशी संबंध! CBI तपासात 3 जणांना अटक
आता SC/ST, ओबीसींना काँग्रेसमध्ये मिळणार 50% आरक्षण, चिंतन शिबिरात घेण्यात आला मोठा निर्णय