हुश्श…. कोल्हापूरकरांची आता ‘ही’ चिंता मिटली..!

जिल्ह्य़ातील शासकीय रुग्णालयातील (government hospital) कामकाज ‘ई सुश्रुत ‘ प्रणाली ने ऑनलाइन होणार असून आता रुग्णाला केसपेपर व औषधोपचाराची फाईल जवळ बाळगावी लागणार नाही. हे कागदपत्र नसतानाही एका टोकन नंबर वरुन एक क्लिकवर त्या रुग्णांवर सरकारी रुग्णालयात यापूर्वी कोणते उपचार केले याची माहिती उपलब्ध होणार आहेत.

या सेवेंतर्गत पहील्या टप्प्यात ऑनलाईन पध्दतीने केसपेपर देण्यात येणार आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात पहील्या टप्प्यात सेवा रुग्णालय,गाधी नगर वसाहत रुग्णालय,गडहिंग्लज उपजिल्हा रुग्णालय व कोडोली अशा चार ठीकाणी ई सुश्रुत प्रणाली चालु करण्यात येणार असून त्याची तयारी सुरु झाली आहे.

सध्या या रुग्णालयात रुग्ण आल्यानंतर ऑफलाईन पद्धतीने केसपेपर काढावा लागत आहे. ही प्रणाली सुरु झाल्यावर केवळ एका टोकन नंबर वर संपूर्ण जिल्ह्य़ात आरोग्य सेवा उपलब्ध होणार आहे. विशेष म्हणजे रुग्णाला कीवा नातेवाईकांना कोणतीही फाईल संभाळावी लागणार नाही. कोणती तपासणी करायची आहे त्या विभागात जाऊन फक्त आपला टोकन नंबर सांगताच रुग्णाला आरोग्य सेवा उपलब्ध होणार आहे.

बाह्यरुग्ण विभाग ते शस्त्रक्रिया विभागा पर्यंत सर्व विभाग हे ऑनलाईन झाल्याने रुग्णासह डाॅक्टराचाही वेळ वाचणार आहे. सध्या केसपेपर ऑनलाईन पद्धतीने होणार असून येणाऱ्या काही दिवसात सर्व शासकीय रुग्णालयात ही प्रणाली सुरु होणार असून त्याचे प्रशिक्षण ही देण्यात येणार आहे.

९० टक्के काम पूर्ण

जिल्हय़ातील चार (government hospital) रुग्णालयासाठी पहील्या टप्प्यात ऑनलाइन कामकाजासाठी ८५ संगणक व ३५ प्रिंटर मिळाले आहेत. ऑनलाइन कामकाजामुळे रुग्ण व रुग्णांचे नातेवाईक, डॉक्टरांचा वेळ वाचणार आहे. ऑनलाइनचे काम ९० टक्क्यांपेक्षा जास्त पूर्ण झाले आहे.”

शासकीय रुग्णालयाचे पूर्ण कामकाज ऑनलाइन होणार असल्यामुळे केसपेपर काढण्यापासून ते डॉक्टरांना भेटण्यापर्यंतचा वेळ हा संगणक प्रणाली मध्ये सेव्ह राहणार आहेत. शिवाय रुग्ण किती वाजता बाहेर पडला याची देखील माहिती या प्रणालीमध्ये राहणार आहे. त्यामुळे शासकीय रुग्णालयातील संबंधित डॉक्टरांना त्यांच्या कक्षामध्ये ठरलेल्या वेळे नुसार हजर राहणे बंधन कारक राहणार आहे.

ई सुश्रुत’प्रणाली मुळे शासकीय रुग्णालयातील कागदोपत्री होणारे कामकाज कमी होणार आहे. परिणामी रुग्ण रुग्णांच्या नातेवाईक व डॉक्टरांचाही वेळ वाचणार आहे. रुग्णाच्या आजार व उपचाराची माहिती समजू शकेल.” – डॉ अनिल माळी. जिल्हा शल्य चिकित्सक.

हेही वाचा :


पराभवानंतर रोहित शर्माला लाखो रुपयांचा दंड!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *