कोल्हापूर : पाच दशकांत कोल्हापुरात 41 वेळा उष्णतेची लाट!

भारतीय हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात 9 मे 1988 रोजी उच्चांकी 42.3 इतक्या तापमानाची (today weather) नोंद झाली होती. यानंतर गेल्या दहा वर्षांत 2013, 2016 आणि 2019 ला मे महिन्यात पारा 40 च्या पुढे गेला होता. यंदाही तापमान 40 पार गेल्याने नागरिकांची लाही लाही होत आहे. काँक्रिटचे जंगल, सिमेंटचे रस्ते आणि मोठ्या प्रमाणात झालेली झाडांची कत्तल यामुळे हा हवामान बदलाचा फटका कोल्हापूरला सहन करावा लागत असल्याची शक्यता पर्यावरण तज्ज्ज्ञांनी व्यक्‍त केली आहे.

संपूर्ण देशभर वाढत्या उष्णतेचा कहर सुरू आहे. उत्तरेकडून महाराष्ट्रापर्यंत उष्णतेच्या लाटा सक्रिय होत आहेत. याचा तडाखा कोल्हापूरला देखील बसत असून रविवारी (दि. 8) जिल्ह्यात गेल्या चार वर्षांतील (40.3) उच्चांकी तापमानाची नोंद झाली. भारतीय हवामान संशोधन आणि सेवा कार्यालयाकडील आकडेवारीनुसार गत दहा वर्षांत (2012-2021) मे महिन्यात केवळ तीन वेळा कोल्हापूरचे (today weather) तापमान 40 पार गेले आहे. याशिवाय गेल्या पाच दशकांत तब्बल 41 वेळा जिल्ह्याला उष्णतेच्या लाटेचा फटका बसला आहे.

दहा वर्षांतील
मे महिन्यातील तापमान
वर्ष कमाल किमान
2021 36.8 25.5
2020 39.6 30.9
2019 41.2 33.4
2018 39.1 31.8
2017 39.8 31.4
2016 41.1 33.3
2015 39.0 29.5
2014 38.2 30.8
2013 40.3 26.9
2012 39.5 30.8

हेही वाचा :


नैसर्गिक आपत्तीवर मात करण्यासाठी होमगार्ड सज्ज

Leave a Reply

Your email address will not be published.