कोल्हापुरमध्ये घरगुती गॅस सिंलेडरच्या दरवाढ विरोधात अनोखं आंदोलन!

कोरोनामुळे  घाईला आलेल्या अर्थव्यवस्थेमुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या होत्या. तर ज्यांना मिळाल्या त्या तटपंज्या पगारावर आपले आणि आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करत आहेत.त्यातच आता वाढणाऱ्या राज्यातील महागाईमुळे जनता त्रस्त झाली आहे. यातच आता पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढत असून सर्वसामान्यांनी गाड्या वापरायच्या की नाही असाच सवाल विचारला जात आहे. तर वाढत्या महागाईने गृहणींना अडचणीत आनले आहे.(gas cylinder price)

त्यातच आता घरगुती गॅस सिंलेडर (gas cylinder price)  महाग झाल्याने आता काय करायचं असाच प्रश्न त्यांच्यासमोर आवाचून उभा झाला आहे. वाढणाऱ्या या महागाई आणि वाढलेल्या घरगुती गॅस सिंलेडरच्या दरवाढविरोधात कोल्हापूरात आवाज उठविण्यात आला. तसेच गॅस सिंलेडरच्या टाक्या पंचगंगा नदीत फेकून अनोखे आंदोलन करण्यात आले आहे. तर केंद्र सरकारविरोधात  घोषणा देण्यात आल्या. त्यामुळे कोल्हापूरात केलेल्या या आंदोलनाचा राज्याच चर्चेचा विषय बनला आहे.

Indian Oil ग्राहकों के लिए लाया एक्सट्रा तेज सिलेंडर, अब 14 फीसदी तक होगी  गैस की बचत, जानें इसकी खासियत - Indian Oil brings to you Indane XtraTej gas  cylinder for save

थेट 50 रुपयांनी वाढ

महागाई कमी करण्याचे आश्वासन देत सत्तेवर आलेल्या मोदी सरकारने पेट्रोल, डिझेलसह घरगुती गॅस सिलिंडरचे दर वाढविले आहेत. सर्वसामान्य जनतेच्या आवाक्याबाहेर महागाई गेली आहे. याच्या निषेधार्थ कोल्हापूर शहर नागरी कृती समितीनं आज, सोमवारी अनोखे आंदोलन केले.

पंचगंगा नदीत सिलिंडर फेकून  केंद्र शासनाचा निषेध नोंदविण्यात आला. तर कोल्हापुरात जे घडते ते राज्यात चर्चेचा विषय होतो. आज कोल्हापूर शहर नागरी कृती समितीनं एक आनोखे आंदोलन करत सरकार आणि प्रशासनाला जाग आणण्याचा प्रयत्न केला. शनिवारी 14.2 किलोच्या घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत भडका उडाला आणि किंमतीत थेट 50 रुपयांनी वाढ झाली होती. 50 रुपयांच्या वाढीनंतर राजधानी दिल्लीत 14.2 किलो गॅस सिलिंडरची किंमत आता 999.5 रुपयांवर पोहोचली. तर राज्यातील मुंबईतही या सिलिंडरची किंमत 999.5 रुपयांवर पोहोचली आहे.

गॅस सिंलेडर दराविरोधात आवाज

त्यामुळे कोल्हापूर शहर नागरी कृती समितीनं वाढलेल्या गॅस सिंलेडर दराविरोधात आवाज उठवत केंद्र सरकारविरोधात घोषणा देण्यात आल्या. तसेच गॅस सिंलेडर मोकळ्या टाक्या पंचगंगा नदीत फेकून अनोखे आंदोलन करण्यात आलं. यावेळी महिला वर्ग मोठ्या प्रमाणावर हजर होता. दरम्यान असेच अंदोलन सांगली जिल्ह्यातही मदनभाऊ युवा मंचने केले होते. मदनभाऊ युवा मंचने कृष्णा नदीत सिलिंडर अर्पण करून केंद्र शासनाचा निषेध केला होता.

हेही वाचा :


सोनाक्षी सिन्हाचं ठरलं…एगेंजमेंटचे फोटो सोशल मीडियावर शेअर…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *