जिल्हा परिषदेतील रिक्त जागा सरळ सेवा भरतीने भरणार : मंत्री हसन मुश्रीफ

जिल्हा परिषदेतील ‘क’ व ‘ड’ वर्गाच्या रिक्त जागा सरळ सेवा भरतीने (recruitment) भरण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे, अशी माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सोमवारी (दि.२) दिली.
अनुकंपा तत्त्वावरील नियुक्ती आदेश प्रदान कार्यक्रम आज जिल्हा परिषदेच्या राजर्षी शाहू सभागृहात झाला. या कार्यक्रमात मंत्री मुश्रीफ बोलत होते. पालकमंत्री सतेज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला.
जिल्हा परिषदेतील ‘क’ व ‘ड’ वर्गाच्या जागा आउटसोर्सिंग करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. परंतु, हा निर्णय आज मागे घेत मंत्री मुश्रीफ यांनी या जागा जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या समितीच्या वतीने (recruitment) भरण्यात येतील, असे स्पष्ट केले.
हेही वाचा :