कोल्हापूर: वडरगे येथील जवान दीपक गायकवाड यांचे झाशी येथे हृदयविकाराने निधन

heart attack

गडहिंग्लज: (प्रतिनिधी) वडरगे (ता-गडहिंग्लज) येथील जवान दीपक दिनकर गायकवाड (वय-३४) यांचे झाशी (उत्तरप्रदेश) येथे हृदयविकाराच्या (heart attack) तीव्र धक्क्याने निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने गायकवाड कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. याबाबतची अधिक माहिती अशी की, जवान दीपक गायकवाड हे भारतीय सैन्य दलात २००४ साली भरती झाले होते. भरतीनंतरचे प्रशिक्षण नाशिकमध्ये झाले. त्यानंतर त्यांनी आसाम ,जम्मू काश्मीर, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश आदी ठिकाणी सेवा बजावली होती. सध्या ते झाशी(उत्तरप्रदेश) येथे सेवेत होते.

११ जुलै रोजी गावातून दीपक आपल्या फॅमिलीसोबत झाशी येथे गेले होते. काल रात्री ते ड्युटी करून घरी आले होते. बुधवारी सकाळी ११ च्या दरम्यान त्यांना घरी अचानक चक्कर आल्याने जमिनीवर कोसळले. पत्नी पूजा यांनी शेजाऱ्यांना बोलवून दिपक यांना तत्काळ आर्मी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. पण त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

जवान दिपक यांचे वडील भारतीय सैन्य दलात होते. दीपक यांचेही लहानपणापासूनच सैन्यदलात भरती होण्याचे स्वप्न होते. जवान दिपक यांचे शिक्षण पहिली ते चौथी पर्यंत वडरगे गावातील विद्यामंदिर शाळेत तर ५ वी ते १२ वी पर्यंतचे शिक्षण विवेकानंद हायस्कुल गडहिंग्लज येथे झाले आहे. बारावीनंतर दीपक भारतीय सैन्य दलात भरती झाले होते. त्यांच्या पश्चात आई-वडील,पत्नी,दोन मुले,दोन बहिणी असा परिवार आहे. जवान दीपक यांचे पार्थिव उद्या (शुक्रवार) पर्यंत वडरगे येथे येण्याची शक्यता आहे (heart attack).

 

Smart News:-