कोल्हापूर: संघटीत झाल्याशिवाय विजय अशक्य

Victory

चंदगड शहरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संचलन

चंदगड : कलियुगात संघटन हीच शक्ती असून संघटित झाल्याशिवाय विजय(Victory) अशक्य असल्याचे मत अभिजीत कुलकर्णी यांनी व्यक्त केले. चंदगड येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संचलन व दसरा उत्सवानिमित्त ते बोलत होते

यावेळी जिल्हा संघ चालक भास्कर श्रीनिवास कामत, शांताराम हजगुळकर, शाताराम भिंगुर्डे, अनिकेत मांद्रेकर यांच्यासह स्वयंसेवक व नागरिक उपस्थित होते. तालुका संघचालक आशिष दाणी यांनी प्रास्ताविक केले. विवेक सबनीस यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. दीपक वडर यांनी वैयक्तिक तर संजय काणेकर यांनी सांघिक पदय सादर केले(Victory). जितेंद्र मुळीक यांनी अमृतवचन तर सुरेश बागिलगेकर यांनी सुभाषित सांगितले. यावेळी घोष पथकासह गणवेषधारी स्वयंसेवकांचे झालेले शिस्तबद्ध संचलन हा चंदगडकरांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. संतोष गावडे यांनी कार्यक्रमाच्या नियोजनासाठी विशेष परिश्रम घेतले.

Smart News:-