व्हिडिओ : हुपरीत पावसाचेही ‘दोन गट’…एका बाजुला मुसळधार…तर, दुसरीकडे…

सध्या शिवसेनेतील बंडखोरी हा संपूर्ण देशात चर्चेचा विषय बनला आहे. जिकडे तिकडे या बंडाचीच चर्चा आहे. अशा काळात हुपरीत रस्‍त्‍याच्या एका दिशेला जोरदार पाऊस (rain) तर दुसऱ्या बाजूला अगदी पावलावर कडकडीत उन  अशी मजेदार स्‍थिती अनुभवास मिळाली. या पावसाची जोरदार चर्चा सध्या सुरू आहे.

रस्‍त्‍यावर एका भागात धो-धो पाऊस (rain) पडत होता, तर त्‍याच रस्‍त्‍यावर दुसर्‍या बाजुला अगदी कडकडीत उन  होते. निसर्गाची ही मजा काही औरच होती. पावसाने दोन गट पाडले, अशा पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाल्या.

सध्या पावसाने हूल दिली आहे. मान्सून गायब झाल्याचे चित्र आहे. अशातच हुपरीत दुपारी पाऊस झाला. माळभागात झालेला पावसाची मजा काही औरच होती. एकीकडे जोरदार पावसामुळे या रस्‍त्‍यावरून प्रवास करणारे नागरिक भिजले होते. याच रस्‍त्‍यावरून थोडे अंतरावर प्रवास करताना कडक उन्हाची अनुभूती येत होती.

अनेकांनी हें दृश्य आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात टिपले आहे. श्रावण सरींचा अनुभवच यावेळी आला. राज्यातील गटाच्या राजकारणाचा आधार घेत पावसाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

हेही वाचा :


बंडखोर प्रकरणात मोठा ट्विस्ट; एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करा..!

Leave a Reply

Your email address will not be published.