कोल्हापूर खंडपीठासाठी मुख्य न्यायमूर्तीची भेट घेणार

कोल्हापूर खंडपीठ कृती समितीला मुख्यमंत्री शिंदे यांचे आश्वासन
कोल्हापूर: कोल्हापुरात मुंबई उच्च न्यायालयाच्या(High Court) खंडपीठासाठी मुख्य न्यायमूर्ती दिपांकर दत्ता यांची लवकरच भेट घेऊन सविस्तरपणे चर्चा करणार, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूर येथे बोलताना स्पष्ट केले. कोल्हापूर खंडपीठाबाबत आपल्याला परिपूर्ण माहिती आहे, खंडपीठासाठी आपण पाठपुरावा करू, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
कोल्हापूर खंडपीठ कृती समिती व कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनच्या संयुक्त शिष्टमंडळाने मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांची कोल्हापूर विमानतळावर भेट घेऊन त्यांना खंडपीठाबाबत निवेदन दिले.
यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, मुंबई उच्च न्यायालयाचे(High Court) कोल्हापुरात खंडपीठ व्हावे, यासाठी प्रदीर्घ काळ लढा सुरू आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यातील पक्षकार व वकीलांची खंडपीठासाठी आग्रही मागणी आहे. याची आपल्याला माहिती आहे. या संदर्भात आपण लवकरच मुख्य न्यायमूर्ती यांच्याशी भेट घेऊन चर्चा करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. संयुक्त शिष्टमंडळामार्फत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही निवेदन देण्यात आले. यावेळी माजी आम. राजेश क्षीरसागर, खंडपीठ कृती समितीचे अध्यक्ष अॅड. गिरीश खडके, महाराष्ट्र गोवा बार कौन्सिलचे सदस्य अॅड. विवेक घाडगे, ज्येष्ठ वकील महादेवराव आडगुळे, अॅड. प्रकाश मोरे, अॅड. प्रशांत चिटणीस आदी उपस्थित होते.
Smart News:-
मी शस्त्रक्रियेच्या गुंगीत असताना सरकार पाडण्याचा प्रयत्न, उद्धव ठाकरेंचा गंभीर आरोप
प्रधानमंत्री आवास योजनेस एकनाथ शिंदे सरकारचा खो
सोलापूर महापालिका निवडणुक, राजकीय परिवर्तनामुळे महापालिकेवर भाजपाची पकड अधिक घट्ट होणार का?
तब्बल 6 लाख आधार कार्डची रद्दी!