‘क्या कूल हैं हम’ चित्रपटाचे दिग्दर्शक संगीत सिवन यांचे निधन

नुकताच एक अत्यंत हैराण करणारी बातमी पुढे येताना दिसत आहे. चित्रपटसृष्टीला(director) मोठा धक्का बसल्याचे बघायला मिळतंय. प्रसिद्ध दिग्दर्शक-सिनेमॅटोग्राफरचे निधन झाले आहे. आता अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर दु:ख व्यक्त केलंय. बाॅलिवूड अभिनेता रितेश देशमुख यानेही भावनिक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केलीये. मल्याळम आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक-सिनेमॅटोग्राफर संगीत सिवन यांचे बुधवारी निधन झाले. आता संगीत सिवन यांच्या निधनाने सर्वांनाच मोठा धक्का बसल्याचे बघायला मिळत आहे.

रिपोर्टनुसार, खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना संगीत सिवन यांनी अखेरचा(director) श्वास घेतला. त्यांचे निधन कसे झाले, याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही. संगीत सिवन यांच्या निधनानंतर अभिनेता रितेश देशमुख याने एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली. फक्त रितेश देशमुख हाच नाही तर अनेक कलाकारांनी पोस्ट सोशल मीडियावर शेअर केल्या आहेत.

रितेश देशमुखने फोटो शेअर करत लिहिले की, हे जाणून मला धक्का बसला की, संगीत सिवन हे आज आपल्यात नाहीत, खरोखरच मी हैराण झालोय. एक नवीन कलाकार म्हणून, कोणीतरी तुमच्यावर विश्वास ठेवावा आणि तुम्हाला संधी द्यावी एवढीच तुमची इच्छा असते. क्या कूल हैं हम और आपण सपना मनी मनीसाठी त्यांना धन्यवाद बोलू शकलो नसल्याचेही रितेश देशमुख याने म्हटले.

पुढे रितेशने लिहिले की, प्रेमाने बोलणारे आणि नम्र असलेले माणूस, आज माझे हदय तुटले. मी त्यांच्या कुटुबाच्या दुखात सहभागी असल्याचेही रितेशने म्हटले. मी तुम्हाला आणि तुमच्या हास्याला मिस करेल असेही रितेश देशमुख याने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. संगीत यांनी पुणे फिल्म इन्स्टिट्यूटमधून चित्रपटाचा कोर्स केला.

संगीत सिवन यांनी 61 व्या वर्षी शेवटचा श्वास घेतला. संगीत सिवन हे संतोष सिवन आणि संजीव सिवन यांचे भाऊ होत. संगीत सिवन यांनी अचानक जगाचा निरोप घेतल्याने सर्वांनाच मोठा धक्का बसल्याचे बघायला मिळतंय. मात्र, अजूनही संगीत सिवन यांच्या निधनाचे नेमके कारण काय हे कळू शकले नाहीये. मात्र, सर्वांनाच मोठा धक्का बसलाय.

हेही वाचा :

या मतदारांचं करायचं काय?

महागाईचा भडका! तुरीच्या डाळीत 30 टक्के तर उडदाच्या डाळीत 15 टक्क्यांची वाढ

सांगली : षड्‍यंत्र रचून काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी शिवसेनेचा घात केला; ठाकरे गटाच्या नेत्याचा गंभीर आरोप