“मुंबई सोडून सेल्समनची नोकरी; दोन वेळच्या जेवणाची भ्रांत ते यशस्वीचा संघर्ष – भावाच्या हालअपेष्टांची कहाणी”

भारतीय(Indian) क्रिकेट संघाचा उगवता स्टार म्हणून पाहिलं जाणाऱ्या यशस्वी जैसवालचा मोठा भाऊ तेजस्वी जैसवाल सध्या चर्चेत आहे. तेजस्वी जैसवालने रणजी ट्रॉफीत आपलं पहिलं अर्धशतक झळकावलं आहे. फर्स्ट क्लास क्रिकेटमधील हे त्याचं पहिलंच अर्धशतक आहे. रणजी ट्रॉफीच्या हंगामातील चौथ्या फेरीत त्याने अर्धशतक झळकावलं आहे. त्रिपुरासाठी खेळताना तेजस्वीने अगरतालाविरोधात 82 धावांची खेळी केली आणि एक विकेटही घेतली. यशस्वी जैसवाल सध्या सर्व फॉरमॅटमध्ये खेळत आहे. दरम्यान तेजस्वीने आपल्या छोट्या भावाचं क्रिकेटर होण्याचं स्वप्न करण्यासाठी एकदा क्रिकेटला रामराम ठोकला होता.

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तेजस्वीने खुलासा केला की, यशस्वी आणि तो दोघेही आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुंबईत आले होते. पण त्यांच्यातील एकालाच आपलं स्वप्न पूर्ण करणं शक्य होतं. “मलाही क्रिकेट खेळायचं होतं. पण आमच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती फार चांगली नव्हती. यशस्वी चांगली कामगिरी करत होती. यामुळे 2013 च्या अखेरीस मी मुंबई आणि क्रिकेट दोन्ही सोडलं आणि दिल्लीला गेलो. तिथे आमच्या एका नातेवाईकाचं दुकान आहे,” असं तेजस्वीने इंडियन (Indian)एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं.

तेजस्वीने यावेळी आपल्यावर एकदा खरं वय लपवल्याचा आरोप केल्याचंही सांगितलं आहे. पण या आरोपांमुळे क्रिकेट सोडणं त्यावेळी फार सोपं झालं असंही त्याने स्पष्ट केलं. आपल्याला यशस्वीच्या शक्यता कमी करायच्या नव्हत्या असा खुलासाही त्याने केला.

“मी हॅरिस शिल्डमध्ये एक सामना खेळला होता आणि सात विकेट्स घेतल्या होत्या. नंतर लोक म्हणू लागले की माझं वय खरं नसून ते पडताळण्याची गरज आहे. मला दीड वर्षांसाठी बेंचवर बसवण्यात आलं. यशस्वी त्यादरम्यान खूप चांगली कामगिरी करत होता आणि मला माझ्यामुळे त्याचं नुकसान करायचं नव्हतं. आम्हा दोघांसाठी मुंबईत राहणं फार खर्चिक होत होतं. दोघांसाठी दोन वेळच्या जेवणाची व्यवस्था करणं आमच्यासाठी कठीण होतं. तोपर्यंत यशस्वीचे प्रशिक्षक ज्वाला सर यांच्याशी काही संबंध आला नव्हता,” असंही तेजस्वीने सांगितलं.

आता 27 वर्षांचा असलेल्या तेजस्वीने वयाच्या 17 व्या वर्षी सेल्समन म्हणून काम करण्यासाठी मुंबई सोडली होती. आपल्या कमाईच्या माध्यमातून तेजस्वीने आपल्या दोन बहिणींची लग्नंही लावली. यानंतर तेजस्वी उरलेले पैसे मुंबईत जैस्वालला खर्टासाठी पाठवत असे. “2021 पर्यंत, माझ्या बहिणींची लग्ने झाली आणि यशस्वीला आयपीएल करार मिळाला. त्यानंतर आमच्यासाठी आयुष्य सोपे झाले,” असं तेजस्वीने सांगितलं

हेही वाचा :

“बॉर्डर गावस्कर ट्रॉफीपूर्वी मोहम्मद शमीचं प्रभावी पुनरागमन, पहिल्याच सामन्यात घेतल्या 4 विकेट्स”

सत्तेत आलो तर लाडक्या बहिणींना महिन्याला 3 हजार रुपये देणार, नाना पटोलेंची घोषणा

बड्या नेत्यांच्या बॅगा तपासणे एक उपचार, आचारसंहितेचा