या देशात राहतात जगातील सर्वात रोमँटिक लोक

असं म्हणतात जगात रोमँटिक (romantic) लोक बरेच असतात मात्र जर तुम्हाला विचारले की जगातील सर्वात रोमँटीक लोक कुठे राहतात तर तुम्हालाही प्रश्न पडेल. पण एका सर्व्हेत स्कॉटलंडचे लोक जगातील सर्वात रोमँटीक म्हणून समोर आले. याबाबतीत त्यांनी ब्रिटिश, वेल्श, आइरिश, फ्रेंच इटालियन आणि अमेरिकी लोकांनाही मागे टाकले आहेत. विशेष म्हणजे ‘Loveit Coverit या कंपनीकडून करण्यात आलेल्या सर्वेक्षणात ब्रिटनमधील 2,000 लोकांनी सहभाग घेतला होता.
या सर्व्हेत स्कॉटलंड 43 टक्के गुणांसह अव्वल स्थानावर आहे तर वेल्सने ३० टक्के गुणांसह शेवटचे स्थान पटकावले. या सर्व्हेत टॉप-10 मध्ये या देशांची नावे आहेत-
१. स्कॉटलंड (43%)
२. इटली (41%)
३. फ्रान्स (38%)
४. इंग्लंड (37%)
५.स्पेन (35%)
६.अमेरिका (34%)
७. पोर्तुगाल (32%)
८. आयर्लंड (32%)
९. स्वीडन (31%)
१०. वेल्स (30%).
या सर्वेक्षणात भाग घेतलेल्या ब्रिटनमधील हजारो लोकांनी सांगितलं आहे की रोमँटिक (romantic) हॉलिडेवर जाणाऱ्यांमध्ये स्कॉटिश लोक जगातील सर्वोत्तम लव्हर्स आहेत.
या क्विझमधील सहभागींना 1 ते 10 च्या स्केलवर त्यांच्या सुट्टीच्या फ्लिंग्सना (Holiday Flings) रेट करण्यास सांगितले होते, काही देशांनी 7 आणि 10 च्या दरम्यान स्कोअर मिळवून टॉप-10 मध्ये स्थान मिळविले. तर, स्कॉटलंड 43 टक्के गुणांसह अव्वल स्थानावर आहे.
हेही वाचा: