उन्हाळ्यात शरीर निरोगी ठेवण्यासाठी ‘या’ फळांचे सेवन नक्की करा!

उन्हाळ्यात कडक ऊन आणि उष्णतेमुळे खूप थकवा आणि सुस्तपणा येतो. या ऋतूत उष्माघात टाळण्यासाठी आरोग्यदायी पदार्थांचा आहारात समावेश करा आणि स्वत:ला (body healthy) ऊर्जावान ठेवा, निरोगी राहण्यासाठी पुरेसे पाणी प्या. आहारात पाणीयुक्त फळांचा समावेश करा. ही फळे आपल्याला निरोगी ठेवण्यास नक्कीच मदत करतील.

कलिंगड हे चवदार फळ आहे. कलिंगड हे अतिशय आरोग्यदायी आहे, त्यात पाण्यासोबतच जीवनसत्त्व A आणि C असते. व्हिटॅमिन ए डोळ्यांसाठी खूप फायदेशीर आहे, त्यामुळे दृष्टी सुधारण्यास मदत होते. व्हिटॅमिन सी रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करते. कलिंगडमध्ये व्हिटॅमिन बी 6 आणि पोटॅशियम असते. यामुळे शरीरातील ऊर्जा वाढण्यास मदत होते.(body healthy)

आंब्यामध्ये भरपूर पोषक असतात. त्यात फायबर असते. यामध्ये अनेक प्रकारची जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात, फायबर पचनसंस्था निरोगी ठेवण्यास मदत करते. त्यात भरपूर पोटॅशियम सोबत जीवनसत्त्व ए आणि सी असते, ते अनेक आजारांपासून तुमचे रक्षण करण्यास मदत करते. यामुळेच या हंगामामध्ये आंब्याचा आपल्या आहारामध्ये समावेस करा.

उन्हाळ्याच्या हंगामात शरीर निरोगी ठेवण्यासाठी खरबूजचा आहारामध्ये समावेश करा. आपण खरबूजच्या रसाचे देखील सेवन करू शकतो. दुपारच्या गरमीमध्ये खरबूजचे नक्कीच सेवन करा.

उन्हाळ्याच्या हंगामामध्ये आपण नारळ पाण्याचे देखील सेवन करायला हवे. कारण उन्हाळ्यात नारळ पाण्याचे सेवन करणे चांगले असते. हे शरीरातील ग्लूकोजची पातळी चांगली ठेवते. हे पिण्यामुळे तुमचे शरीर हायड्रेटेड राहते.

हेही वाचा :


IPL २०२२ मध्ये गुजरात टायटन्सचा धमाका

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *