केस धुताना या चुका टक्कल पडण्याचे कारण बनू शकतात..!

hair wash

केस गळण्याच्या समस्येमुळे 10 पैकी 9 व्यक्ती त्रस्त आहेत. अनेक प्रयत्न, औषध, गोळ्या करुन देखील या समस्येपासून सुटका मिळत नाही. परंतु हे केस गळणं का थांबत नाही? याबद्दल जर थोडा विचार केलात, तर तुम्हाला जाणवेल की, छोट्या छोट्या चुकांमुळेच केसांचे मोठे नुकसान होऊ शकते. परंतु तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, याचा संबंध तुमच्या केस धुण्याशी (hair wash) आहे.

आपल्या चुकीच्या केस धुण्याच्या(hair wash)पद्धतीमुळे केसांचा संरक्षक थर खराब होतात, ज्यामुळे केस कोरडे होतात, झपाट्याने गळतात. त्यामुळे केस धुताना कोणकोणत्या चुका करू नयेत हे तुम्ही जाणून घेतले पाहिजे. ज्यामुळे तुमचं नुकसान कमी होईल.

योग्य शॅम्पू न वापरणे
शॅम्पूची निवड नेहमी केसांचा प्रकार पाहूनच केली पाहिजे. तेलकट केसांवर कोरड्या केसांसाठी बनवलेला शॅम्पू वापरल्यास केसांनाच नुकसान होईल. यासोबतच हेही लक्षात ठेवले पाहिजे की शॅम्पूवर नॅचरल लिहिल्यामुळे ते नैसर्गिक होत नाही, उलट त्यातील घटक काय काय आहेत, हे बघावेत.

केस जास्त धुणे
केस धुताना शाम्पूचा फेस बनवून तो हातात घ्यावा आणि नंतर तो डोक्याला लावावा. तसेच, शॅम्पू फक्त डोक्याच्या मुळांवरच लावला जातो आणि डोके धुताना पुरेसा शॅम्पू उर्वरित केसांपर्यंत पोहोचतो. शॅम्पू सर्व केसांवर लावला जात नाही.

hair wash

वारंवार केस धुणे
केस आठवड्यातून फक्त 3 वेळा धुवावे. यापेक्षा जास्त केस धुतल्याने, केस तुटण्याची आणि कोंडा होण्याची शक्यता वाढते.

मुळांना कंडिशनर लावणे
कंडिशनर केसांच्या मुळांवर नव्हे तर केसांच्या लांबीवर लावावे. टाळूवर कंडिशनर लावून तुम्ही तुमच्याच केसांना इजा करत आहात.

गरम पाण्याने डोके धुवा
गरम पाणी तुमच्या केसांसाठी शत्रू आहे. उन्हाळा असो वा हिवाळा, गरम पाण्याने डोके धुणं टाळावं. थंड पाण्यानी केस धुवावेत किंवा जास्त थंडी असेल, तर कोमट पाण्याने आपले केस धुवावेत. जेणेकरुन तुमचे केस कमी तुटतील.

हेही वाचा :


शिक्षण घेणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी..!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *