उष्माघातापासून आराम मिळवण्यासाठी हे 5 पेय अत्यंत फायदेशीर!

उन्हाळ्यात आराम मिळवण्यासाठी लेमन टी (health care) फायदेशीर मानली जाते. लिंबापासून बनवलेल्या गोष्टींचे सेवन केल्यास आतून थंड राहण्यास मदत होते. सकाळी लिंबू चहा प्यायल्यानंतर तुम्ही घराबाहेर पडू शकता. यामुळे तुमच्या शरीरामध्ये ऊर्जा टिकून राहण्यास मदत होईल.
असे म्हटले जाते की शरीराला आतून थंड ठेवणे खूप जास्त महत्वाचे आहे. गुलाबाची पाने उकळा आणि थंड झाल्यावर पाणी प्या. यामुळे शरीर थंड राहण्यास मदत होते.(health care)
उन्हाळ्याच्या हंगामात ग्रीन टीचे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. उन्हाळ्यात थंडावा देणारी ग्रीन टी पचन सुधारतो आणि वजन कमी करण्यासही मदत करतो. हे हृदयविकाराच्या झटक्यापासूनही आपले संरक्षण करते, असे म्हटले जाते.
पोटातील उष्णता दूर करण्यासाठी पुदिना गुणकारी मानला जातो. उन्हाळ्यात दररोज पुदिन्याचा चहा प्यायल्याने उष्णता येत नाही आणि शरीरात ऊर्जा टिकून राहते. विशेष म्हणजे याचे सेवन केल्याने पोटाचे विकारही दूर राहतात.
लोक दुधात तुळशीची पाने टाकून चहा पितात, पण उन्हाळ्यात काळ्या चहामध्ये तुळशीची पाने टाकून चहा प्यावा. त्यामुळे पोटात उष्णता निर्माण होत नाही आणि शरीर दिवसभर उत्साही राहते. (वरील टिप्स फाॅलो करण्याच्या अगोदर डाॅक्टरांचा सल्ला नक्कीच घ्या)
हेही वाचा :