उन्हाळ्यात टाकीतलं पाणी खूप तापतं? पाणी नेहमी थंडगार ठेवण्यासाठी या घ्या ४ टिप्स!

उन्हाळ्यात टाकीच्या (water tank) पाण्याला स्पर्शही करण्याची इच्छा होत नाही. उन्हाळ्यात टाकीचे पाणी इतके गरम असते की कपडे स्वच्छ करणं, आंघोळ करणे इत्यादी कामे करावीशी वाटत नाहीत.  फ्रीजमध्ये कमी प्रमाणात पाणी थंड करता येते, पण आंघोळ करायची असेल किंवा घर साफ करायचे असेल तर जास्त पाणी लागते.

अशा परिस्थितीत, जर तुम्हालाही (water tank) उन्हाळ्यात टाकीतील गरम पाण्याचा त्रास होत असेल तर तुम्ही हा लेख जरूर वाचा. कारण आम्ही तुम्हाला काही सोप्या टिप्स आणि हॅक्स सांगणार आहोत, जे वापरून तुम्ही टाकीतील पाणी सहज थंड करू शकता.

गोणीचा वापर

टाकीचे पाणी थंड ठेवण्यासाठी गोणी हा एक उत्तम मार्ग आहे. जर तापमान 40 अंश किंवा त्यापेक्षा जास्त असेल तरी आपण टाकीचे पाणी मोठ्या प्रमाणात थंड ठेवू शकता. यासाठी तुम्हाला जास्त मेहनत करण्याचीही गरज नाही. यासाठी तुम्ही चार ते पाच तागाच्या पोत्यांची बांधणी करू शकता. थंड पाण्यात भिजवून टाकी चांगली झाकून ठेवा. पोते सुकल्यावर पुन्हा गोणीवर पाणी टाका. यामुळे टाकीचे पाणी बर्‍याच प्रमाणात थंड राहते.

वापरण्याआधी पाणी बादलीत काढा

जर तुम्हाला पोत्याने टाकी झाकण्यात अडचण येत असेल, तर तुम्ही वापरण्यापूर्वी काही तास पाणी बादलीत किंवा इतर भांड्यात साठवू शकता. दुसर्‍या दिवशी थोडे जास्त पाणी वापरायचे असल्यास, रात्रीच्या वेळीही बादलीत किंवा इतर भांड्यात पाणी ठेवू शकता. यामुळे पाणी थंड राहते.

कूलर फॅनची मदत घ्या

टाकीतील पाणी कमी वेळात थंड करायचे असेल तर कूलर फॅनची मदत घेणे हा उत्तम उपाय ठरू शकतो. यासाठी बादली किंवा इतर कोणत्याही वस्तूमध्ये पाणी भरून कूलरच्या पंख्याखाली ठेवा. यामुळे पाणी काही वेळात थंड होईल.

माठ

उन्हाळ्यात टाकीचे पाणी थंड ठेवण्यासाठी मातीचे भांडे हा एक उत्तम पर्याय आहे. हे पाणी तुम्ही पिण्यासाठी आणि स्वयंपाकासाठी वापरू शकता. यासाठी पाणी वापरण्यापूर्वी काही तास माठात टाकून ठेवा. माठ जास्त उष्णता नसेल अशा ठिकाणी ठेवावा. तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही तागाची गोती पाण्यात भिजवून माठावर झाकून ठेवू शकता. यामुळे पाणी लवकर थंड होईल.

तांब्याच्या भांड्यात पाणी ठेवल्याने खूप लवकर थंड होते असा अनेकांचा समज आहे. अशा स्थितीत टाकीचे पाणी तांब्याच्या भांड्यात ठेवून थंड करू शकता. जर टाकीचा नळ बाहेरील भिंतीवर असेल, तर तुम्ही त्यावर काहीतरी झाकून ठेवू शकता. कारण पाईप गरम झाल्यानंही गरम पाणी बाहेर येऊ शकतं.

हेही वाचा :


हनीमूननंतरचा कॅट-विकीचा सर्वात बोल्ड फोटो व्हायरल!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *