घरच्या घरी घट्ट दही बनवण्यासाठी दुधात मिसळा फक्त ‘हे’ दोन पदार्थ!

अजीर्ण असो किंवा मग आणखी काही कारण, जेवणासोबत छोट्याशा वाटीमध्ये दही सेवन करण्याचा सल्ला अनेकदा दिला जातो. काहीजण तर, न चुकता दर दिवशी त्यांच्या (kitchen tips) आहारामध्ये दह्याचा समावेश करतात. यासाठी मग दररोज बाहेरून दही आणण्यापेक्षा घरच्या घरीच दही तयार करण्याला प्राधान्य दिलं जातं.

इथं मुद्दा असा, की लाख प्रयत्न करुनही घरच्या घरी हे दही बनवताच येत नाही. म्हणजे एकतर ते फारच पातळ किंवा मग विचित्र चवीचं बनतं किंवा मग त्यावर पाण्याचा थरच तयार होतो.(kitchen tips)

चिंता करण्याची गरज नाही. कारण, चांगलं दही बनवण्याच्या प्रयत्नांनी तुम्हीही कंटाळला असाल तर, शांत व्हा. यापुढे ही तक्रार तुम्ही कधीच करणार नाही, कारण जगात भारी दही तुम्हालाच बनवता येणार आहे.

यासाठी लागणारं साहित्य-
आधा लीटर फुल क्रीम दूध
एक चमचा मिल्क पावडर
आधा चमचा कॉर्नफ्लोर
दोन लहान चमचे दही.

प्रक्रिया-
– एका पातेल्यात फुल क्रिम दूध घ्या. आता यामध्ये कॉर्नफ्लोर आणि एक चमचा मिल्क पावडर मिसळा आणि मिश्रण एकजीव करुन घ्या.
– यामध्ये गुठळ्या राहणार नाहीत याची काळजी घ्या. आता हे मिश्रण गरम होण्यासाठी गॅसवर ठेवा. जेव्हा यामध्ये चांगला उकळ येईल तेव्हा गॅस बंद करा.
– आता हे दूध थंड होऊ द्या. जेव्हा दूध कोमट होईल तेव्हा त्यामध्ये दोन चमचे दही पाण्यासोबत मिसळून एकजीव करा.
– एका भांड्यात असणारं हे मिश्रण एखाद्या उबदार जागी 4 ते 5 तासांसाठी ठेवा.
– नंतर हे दही फ्रिजमध्ये ठेवा आणि गरज पडेल तसं ते वापरा. तुम्हाला प्रत्येक वेळी बाजारात मिळतं तसंच दही तुम्हाला मिळेल.

हेही वाचा :


हृदयद्रावक! बाहुलीला फाशी दिल्यानंतर चीमुकल्याची आत्महत्या!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *