Summer Time निरोगी करण्यासाठी जाणून घ्या खास टिप्स!

उन्हाळ्याच्या काळात (summer time) विशेष काळजी न घेतल्यास तुम्ही अनेक आजारांना निमंत्रण देण्यास कारणीभूत ठरू शकता. अशावेळी वेगवेगळ्या वयोगटांनी, वेगवेगळ्या परिस्थितीत काही दररोजच्या जीवनातील गोष्टी लक्षात घेणे आवश्यक आहे. यासह योग्य आहार देखील आवश्यक आहे. गेल्या महिन्याभरापेक्षाही अधिक काळापासून देशभरात उष्णतेची लाट (Heat Wave) आहे. उत्तर, वायव्य आणि मध्य भारतात तापमानानं उच्चांक गाठला आहे. इथं दररोजचं कमाल तापमान 40 ते 42 अंशांवर पोहोचलं आहे. महाराष्ट्रातीलही अनेक शहरात पार चढताच आहे. या काळात योग्य आहार आणि काही काळजी घेणं आवश्यक आहे.
उन्हाळ्यात मुलांची काळजी कशी घ्याल?
मुलांनी नॉर्मल थंड पौष्टिक आहार घेणे आवश्यक आहे जे अत्यंत महत्वाचे आहे. आपले हात, पाय इत्यादी मूलभूत गोष्टीची स्वच्छता राखणे.
मुलांचे लसीकरण वेळेवर करणे आवश्यक आहे. नियमित व्यायाम प्रत्येकासाठी अनिवार्य आहे. मुलांनी टीव्ही किंवा मोबाईल फोनवर 1 तासापेक्षा जास्त वेळ घालवू नये.(summer time)
उन्हाळ्यात मासिक पाळीदरम्यान विशेष काळजी कशी घ्यायची
मासिक पाळीदरम्यानचा प्रवाह कसा असेल त्याच्या प्रमाणावर अवलंबून आहे, पॅड वारंवार बदलणे आवश्यक आहे आणि योग्य फिटिंग पॅड वापरणे आवश्यक आहे. यामुळे उन्हाळ्यात होणारी जळजळ टाळता येईल, त्वचेची होणारी जळजळ टाळणे अत्यंत गरजेचे आहे. व्हजायनल स्वच्छता या दरम्यान महत्वाची आहे.
उन्हाळा आणि फंगल infection हे नातं कसं तोडायचे?
अनेकदा शरीराचा जो भाग झाकलेला असतो त्याठिकाणी संसर्ग किंवा इन्फेक्शन होऊ शकतो. बुरशीजन्य संसर्ग टाळण्यासाठी दिवसातून दोन वेळा आंघोळ करणे आवश्यक आहे. उन्हाळ्यात सैल सुती कपडे घालणे महत्वाचे आहे. पुरुषांमध्ये शरिरावर केसांची वाढ मुळातच अधिक असल्यास बुरशीजन्य संसर्ग टाळण्यासाठी योग्य काळजी घ्या. उन्हाळ्यात योग्य फिटिंग अंडरवियर्स घाला जेणेकरून बुरशीजन्य संसर्ग होणार नाही. अंडरगारमेंट आणि कपडे गरम पाण्यातुन काढू शकता जेणेकरून जीवाणू नष्ट होतील.
उन्हाळ्यात फ्रीजच थंड पाणी प्यावं की नाही?
उन्हाळ्यात तापमान गरम असल्याने प्रत्येकाला थंड पाणी पिण्याची इच्छा असते. परंतु खूप थंड पाणी वरच्या श्वसनमार्गाच्या संसर्गास जन्म देऊ शकते. एखादेवेळी थंड पाणी प्यायचे असेल कर ते सामान्य तापमानाच्या पाण्यात मिश्रित करुन प्या.
उन्हाळ्यात गरोदर बायकांनी काय काळजी घ्यावी?
गर्भवती महिलांनी जीवनसत्त्वे, प्रथिने, कार्बोहायड्रेट्स आणि चरबीसह योग्य आहारासह योग्य पोषक तत्वांचे पालन केले पाहिजे. तिने नियमित व्यायाम केला पाहिजे ज्यामुळे प्रसूतीदरम्यान गर्भवती महिलांना मदत होईल.
उन्हाळ्यात रस्त्यावर मिळणारी सरबत तुम्हाला रुग्णालयात जाण्यास भाग पाडू शकतात का?
उन्हाळ्यात रस्त्याच्या कडेला ज्यूस पिऊ नये कारण त्यात वापरलेले पाणी कोणते आहे हे तुम्हाला माहित नसते. सरबत तयार करण्यासाठी वापरण्यात येणारा बर्फ चांगला असेलच सांगू शकत नाही. सरबत तयार करण्यासाठी मिक्सिंग दरम्यान वापरलेल्या गोष्टीनबद्दल आपल्या माहिती नसते त्यामुळे उन्हाळ्यात रस्त्यावर मिळणारी सरबते पिणे शक्यतो टाळावीत .
हेही वाचा :