जोडीदार तुमच्या पश्चात काय करतो ? महिलांना माहित असणे गरजेचे !

महिलांना वाटत असते की त्यांना त्यांच्या जोडीदाराबद्दल सगळं माहिती आहे; पण काही गोष्टी अशा असतात ज्या महिलांना आतापर्यंत कळल्या नसतील. अर्थात, ही बातमी वाचल्यानंतर त्या गोष्टी नक्कीच कळतील.(lifestyle)

लपून-छपून रडणे

तुम्ही पुरुषांना रडताना फार कमी वेळा पाहिले असेल. ते भावूक होतात पण रडत नाहीत. लहान-मोठ्या भांडणांमध्ये पुरूष रडताना कधीच दिसणार नाहीत; कारण जोडीदारासमोर रडणे त्यांना कमीपणाचे वाटते. पुरूष कायम हसतमुख राहण्याचा प्रयत्न करतात. पण त्यांच्या मनातील दु:ख दबून राहाते.(lifestyle)

इतर महिलांना पाहाणे

इथे आपण फ्लर्ट करण्याबद्दल बोलत नाही आहोत; पण पुरूष आपल्या जोडीदारासोबत चालत असताना इतर महिलांच्या चेहऱ्यापासून ते पोशाखापर्यंत सगळं निरखत असतात. पुरूष तुमच्या नकळत हॉट मुलींना बघत असतात; पण यात काळजी करण्यासारखं काही नाही. या विषयाबद्दल ते आपल्या मित्रांसोबत चेष्टा-मस्करी करतात. तुमच्यासमोर मात्र त्याबद्दल काहीही बोलत नाहीत. तसे बोलल्यास जोडीदार आपल्याबद्दल गैरसमज करून घेईल, अशी भीती पुरषांना वाटते.

महिलांनाच नाही तर पुरुषांनाही बघतात

समान लिंगी व्यक्तिमत्त्वाला पाहाणे म्हणजे समलिंगी असणे नव्हे. इतर पुरुषांची स्टाइल, त्यांचे राहणीमान तुमच्या जोडीदाराला आवडत असते. कपड्यांचा ब्रॅण्ड, स्टाइल, केशरचना, दाढी, इत्यादी गोष्टींसाठी पुरूष एकमेकांना निरखत असतात. जोडीदाराला सांगितल्यास तीसुद्धा इतर पुरुषांना बघू लागेल या भीतीने पुरूष जोडीदाराला काही सांगत नाहीत.

समाजमाध्यमांवर नजर

तुमच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवत असल्याचे जोडीदार सांगत असला तरीही तो तुमच्या समाजमाध्यम खात्यांवर लक्ष ठेवून असतो. तुम्ही कधी काय प्रसारित करता, त्यावर कोण टीप्पणी करते यावर पुरुषांची नजर असते. तुम्ही कोणाला फॉलो करता, कोणाच्या पोस्टवर कमेंट करता याचे निरीक्षण ते करत असतात. पण याबद्दल पुरूष आपल्या जोडीदाराला कळू देत नाहीत.

हेही वाचा :


हिंदुत्वाची शाल राज ठाकरे यांनी कधी पांघरली? शिवसेनेचं प्रत्युत्तर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *