उन्हाळ्यात शरीर उत्साही ठेवणारे ‘हे’ सरबत, घरच्या घरी बनवा..!

उन्हाळ्याच्या दिवसात बऱ्याचदा जेवावसं वाटत नाही. जेवणावरची इच्छाच उडून जाते. अनेक पदार्थ खाण्याऐवजी ताक, ज्यूस किंवा वेगवेगळी सरबतं (syrup) प्यावीशी वाटतात. विशेष म्हणजे या काळात सतत येणाऱ्या घामामुळे शरीरातील पाण्याची पातळी बरीच कमी होते.

त्यामुळे पाणी पिण्याबरोबरच वेगवेगळ्या प्रकारची सरबतं (syrup) पिण्याचीसुद्धा इच्छा होते. आहारतज्ज्ञही उन्हाळ्यात उष्माघात टाळण्यासाठी पारंपरिक पद्धतीने तयार करण्यात आलेली सरबतं भरपूर प्रमाणात प्या असं सांगतात. उन्हाळ्यात आवळा, कोकम, लिंबू, वाळा, खस या सरबतांप्रमाणेच ‘काकडीचे सरबत’ही घरच्या घरी तयार करता येते. शिवाय ऋतुमानानुसार उन्हाळ्यात काकडी बाजारात सहज विकत मिळते. त्यामुळे उन्हाचा दाह शमवणारे, शरीराला थंडावा देणारे काकडीचे सरबत प्यायल्याने अनेक आरोग्यदायी फायदे होतात.

काकडीत भरपूर पोषक तत्त्वे असतात. मुख्य म्हणजे 95 टक्के पाणी असते, यामुळे चयापचय क्रिया सुधारायला मदत होते. काकडी खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते. शिवाय जीवनसत्त्व सी, बीटा कॅरोटीन यासारखे अँण्टीऑक्सिडंटही आढळतात. फायबर्सचे प्रमाणही काकडीत मुबलक असते. त्यामुळे काकडीच्या सरबताची ही खास रेसिपी घरी करून बघायलाच हवी.

साहित्य –

एक काकडी, अर्ध्या लिंबाचा रस, मिरेपूड, चवीनुसार मीठ आणि साखर, चाट मसाला, पुदिन्याची 8 ते 10 पाने.

कृती –

सर्वप्रथम काकडीची साल काढून घ्या. तिच्या बारीक फोडी करा. त्यानंतर काकडीच्या फोडी आणी पुदिन्याची पाने मिक्सरमधून बारीक वाटून घ्या. काकडीच्या फोडी आणि पुदिन्याच्या पानांची पेस्ट गाळून घ्या. त्यामध्ये दोन ग्लास पाणी घाला. नंतर चवीनुसार मीठ, थोडीशी साखर, चाट मसाला आणि मिरेपूड घाला. आता यात लिंबाचा सर घाला. हे सर्व साहित्या घातल्यानंतर सरबत व्यवस्थित ढवळून घ्या. थंडगार काकडीचे चटकदार, तोंडाला चव आणणारे सरबत तयार. आवडीनुसार फ्रिजमध्ये थंड करून प्या किंवा बर्फाचे क्युब्स घालून प्या.

हेही वाचा :


सतेज पाटलांनी हद्दवाढीची ‘ती’ पाच गावे घोषित करावी..!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *