जोडीदार रुसलाय? या ४ मार्गांनी काढा जोडीदाराचा रुसवा

relationship

असं म्हणतात की जिथे प्रेम असतं तिथे दु:ख आणि रागही असतो. अनेकदा नातेसंबंधातील (relationship) भागीदार आपल्या जोडीदारावर रागावतात. खरे तर या नाराजीची अनेक कारणे असू शकतात. कदाचित तुम्ही त्यांना जास्त वेळ देऊ शकत नसल्यामुळे किंवा मग तुम्ही त्यांची पूर्वीसारखी काळजी करत नाही, असं त्यांना वाटत असेल. कदाचित तुम्ही दोघांनी बराच काळ एकत्र चांगला वेळ घालवला नसेल त्यामुळेही तुमचा जोडीदार तुमच्यावर नाराज असेल. अशा परिस्थितीत जर तुम्ही तुमच्या जोडीदाराची नाराजी योग्य वेळी दूर केली नाही तर प्रकरण आणखी बिघडू शकते. पती-पत्नी असो की प्रियकर-प्रेयसी, जास्त काळ रागावणे हे कोणत्याही नात्यासाठी योग्य नाही. नात्यातील अंतर तुमच्या लव्ह लाईफवर परिणाम करू शकते.

वास्तविक, तुमच्या जोडीदाराच्या नाराजीतही त्यांचे प्रेम दडलेले असते, तुम्ही त्यांची नाराजी दूर कराल अशी त्यांची अपेक्षा असते. त्यामुळे नात्यातील अंतर कमी करण्यासाठी आणि तुमच्या प्रेम जीवनात आनंद आणण्यासाठी तुम्हाला काही गोष्टींकडे लक्ष देणे आवश्यक आहे.(relationship)

1. एकमेकांसोबत आनंदात वेळ घालवा-

आजच्या जीवनशैलीत बहुतेक प्रेमसंबंधांमध्ये अंतर येण्याचे कारण म्हणजे जोडीदार एकमेकांना वेळ न देणे. अनेकदा पार्टनरची तक्रार असते की तुम्ही त्यांना वेळ देत नाही. म्हणूनच दोघांनी लांब सुट्टीवर जाणे महत्वाचे आहे. त्यासाठी ते लाँग ड्राइव्हवर देखील जाऊ शकतात किंवा मग एकमेकांसोबत दर्जेदार वेळ घालवू शकतात. यामुळे दुरावा कमी होऊन प्रेम वृद्धींगत होईल आणि नातंही घट्ट होईल. या क्वालिटी टाईममध्ये तुम्ही फक्त एकमेकांसाठी वेळ द्यायला हवा. कार्यालयीन चर्चा किंवा इतर चर्चा यावेळी करायला नको.

2. तुमचा जोडीदार तुमच्यासाठी सर्वात खास आहे-

तुम्हाला तुमच्या पार्टनरला खुश कसे ठेवायचे हे चांगलेच माहीत असणारच. पण बदलती जीवनशैली आणि वेळेची कमतरता यामुळे तुमच्यातील रोमँटिक व्यक्ती कुठेतरी मागे हरवून बसतो. पण असं होऊ देऊ नका. नाते घट्ट करण्यासाठी नेहमी तुमच्या जोडीदाराच्या चेहऱ्यावर हास्य पसरवण्याचा प्रयत्न करा. यामुळे नात्यात ताजेपणा आणि उत्साह टिकून राहतो. छोट्या छोट्या गोष्टींनी त्यांना खूश करण्याचा प्रयत्न करा. कोणत्याही आनंदाच्या किंवा यशाच्या प्रसंगी त्यांना खास वाटावं असं काहीतरी करा. त्यांच्यावर प्रेम करा, मिठी मारा. जेणेकरून त्यांनाही तुमचा आनंद आणि यशाचा भाग बनता येईल. त्यांना मदत करण्यास तयार रहा, कधीकधी तुम्ही त्यांच्यासाठी काहीतरी खास बनवण्याचा प्रयत्न देखील करू शकता. आणि हो, प्रेमाची स्तुती करण्यात काहीच नुकसान होत नाही, त्यामुळे जोडीदाराची स्तुती करण्याची एकही संधी सोडू नका.

3. सरप्राईज गिफ्ट –

भेटवस्तू कोणाला आवडत नाहीत आणि त्यात जोडीदाराकडून सरप्राईज गिफ्ट मिळाले तर आनंद वेगळाच असतो. खरं तर, भेटवस्तू ही आपल्या भावना व्यक्त करण्याचा एक मार्ग आहे. तुमच्या पार्टनरला गिफ्ट देण्यासाठी एखाद्या खास प्रसंगाची वाट का पहावी? केव्हाही सरप्राईज गिफ्ट दिल्याने तुमचे प्रेम कमी होणार नाही. भेटवस्तू महाग असावी असंही काही नाही. जोडीदाराला हे गिफ्ट मिळताच त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसेल. विचार करा की तुमचे प्रेम तुमच्यासमोर आरशासारखे उभे राहील. यापेक्षा चांगला रोमँटिक क्षण कोणता?(relationship)

4. जोडीदाराला त्याच्या पद्धतीने जगू द्या-

प्रेमाच्या नात्यात सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे विश्वास. म्हणून नेहमी आपल्या जोडीदारावर विश्वास ठेवा. नाते घट्ट ठेवण्यासाठी जोडीदाराला थोडी स्पेस देणे आवश्यक आहे. त्यांना अडवणूक करणे योग्य नाही, त्यांना कोणतेही काम करण्यापासून रोखणे देखील योग्य नाही. त्यांचे स्वतःचे सामाजिक आयुष्य असू शकते, मित्र असू शकतात ज्यांच्यासोबत त्यांना वेळ घालवायचा असू शकतो. त्यांना पूर्ण स्वातंत्र्य दिले पाहिजे. प्रेमाला साखळदंडात बांधून ठेवलं जात नाही. प्रेम जितके मोकळे असेल तितके नाते अधिक लांब आणि मजबूत होतं. म्हणूनच तुम्ही तुमच्या जोडीदाराचा चांगला मित्र असणंही खूप गरजेचं आहे.

Smart News:-

चाहत्याने KL Rahul ला का दिली आथियाची शप्पथ?


राणा दाम्पत्याला आणखी एक झटका…


बिग बींच्या लेकिचे अनपेक्षित फोटो समोर…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *