…तर कुणीही सहजपणे तुमच्या प्रेमात पडेल..!

relationship tips

तुम्हाला एखादी व्यक्ती आवडत असेल तर त्या व्यक्तीला तुम्ही आवडालच असं नाही (relationship tips). पण आता तज्ज्ञांनी अशी ट्रिक सांगितली आहे, की प्रत्येक व्यक्तीला तुम्ही आवडला. प्रत्येक व्यक्ती तुमच्या प्रेमात पडेल. सहजसोप्या 4 पद्धतीने तुम्ही कुणालाही आपल्याकडे आकर्षित करू शकता.

रिलेशनशिप एक्स्पर्ट किम्बर्ले मॉफिटने (Kimberly Moffit) रिलेशनशिपच्या काही खास टीप्स दिल्या आहेत. @ask_kimberly नावाच्या टिकटॉक अकाऊंटवर तिने आपली एक पोस्ट शेअर केली आहे. या चार टिप्स फॉलो केल्या तर कुणालाही तुम्ही आवडाल, कुणीही तुमच्या प्रेमात पडेल(relationship tips), असा दावा तिने केला आहे.

यामागे वैज्ञानिक कारण आहे जे समोरच्या व्यक्तीच्या मनात तुमच्यासाठी भावना निर्माण करण्याचा प्रयत्न करतं असं ती म्हणाली. आपल्या करिअरमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचा अभ्यास करून माणसाचं मन वाचण्याचा प्रयत्न तिने केला. यामार्फतच तिने या काही टीप्स तयार केल्याचं सांगितलं आहे. तिच्या मते, याला रेसिप्रोकल लाइकिंग कॉन्सेप्ट म्हणतात.

relationship tips

किम्बर्लेच्या या 4 टीप्स कोणत्या आहेत पाहुयात.

1) एखादी व्यक्ती तुम्हाला आवडत असेल तर त्या व्यक्तीला त्याबाबत सांगा आणि त्या स्पेशल कनेक्शनची जाण तिला होऊ द्या.

2) एकमेकांमध्ये असलेल्या समानतेबाबत बोला. या समानता काहीही असू शकतात पण यामुळे समोरील व्यक्तीला तुम्ही तिच्यासारखेच आहात हे दिसून येईल.

3) मेकअप करण्याऐवजी कधीतरी आपल्या नैसर्गिक लूकमध्येच एकमेकांना भेटा. विशेषतः जर तुम्हाला एखादा तरुण आवडतो तर त्याला तुमचा नैसर्गिक चेहराही पाहू द्या यामुळे दोघांनाही कम्फर्ट वाटेल.

4) समोरच्या व्यक्तीला सांगा की तुम्हाला एखादी दुसरी व्यक्ती आवडते. त्यामुळे त्या व्यक्तीची प्रोटेक्टिव्ह इंस्टिक्ट जागृत होईल आणि ती तुमच्यासोबत नातं पक्कं करेल.

एरवी तुम्हाला एखादी व्यक्ती आवडत असेल तर त्या व्यक्तीकडे मुद्दामहून दुर्लक्ष करा जेणेकरून त्या व्यक्तीला तुमचं महत्त्व पटेल, त्या व्यक्तीला भेटताना चांगंल दिसण्याचा प्रयत्न करा, कुणा दुसऱ्या व्यक्तीकडे कमी लक्ष द्या, असे सल्ले नातं मजबूत करण्यासाठी दिले जातात. पण किम्बर्लेने दिलेल्या या टिप्स अगदी याच्या उलट आहेत. त्यामुळे यावेळी या हटके टीप्स फॉलो करायला काहीच हरकत नाही. हो ना.

हेही वाचा :


सांगली रस्त्यावर मुलाचा खून की अपघात?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *