चांदीचे दागिने काळे पडल्यास ‘असे’ करा स्वच्छ…

silver jewelry clean

सोन्या-चांदीचे दागिने (Gold Silver Jewelry) परिधान करायला सगळ्यांनाच आवडतं. पण चांदीचे दागिने (Silver Jewelry) वापरात आल्यानंतर त्याची चमक कमी होते आणि हे दागिने काळे पडतात.फक्त दागिनेच नाही तर भांडी, मूर्तीदेखील कालांतराने काळसर होतात. पण काळसर झाल्याने या वस्तू खराब होत नाही किंवा त्याचं मूल्य कमी होत नाही. या दागिन्यांची, भांड्यांची चमक परत कशी आणायची असा प्रश्न अनेकांना पडतो

चांदीचे दागिने (jewelry) करा चकाचक

1. गरम पाण्यात पांढरं व्हिनेगर घ्या. त्यात मीठ टाका. यात आता तुमचे चांदीचे दागिने भिजत ठेवा. अर्धा तास तसंच राहू द्या. त्यामुळे चांदीवर साचलेली घाण सहज बाहेर येते. काही वेळाने खराब टूथब्रश वापरून हे दागिने स्वच्छ करा.

2. चांदीच्या वस्तू टूथपेस्ट आणि टूथ पावडरनेही उजळल्या जाऊ शकतात. पण यासाठी पांढरी कोलगेट टूथपेस्ट आणि टूथ पावडरचा वापर करा. ब्रशवर पेस्ट घ्या, चांदी घासून घ्या त्यावर गरम पाणी टाका. काही वेळातच चांदीच्या वस्तू चमकू लागतील.

3. गरम पाण्यात एक चमचा बेकिंग सोडा टाकून त्यात चांदीच्या वस्तू टाका. अर्ध्या तासानंतर घासून घ्या. चांदी स्वच्छ होईल. जर तुम्ही घासण्यासाठी फॉइल पेपर वापरत असाल तर तुम्हाला अधिक चांगली चमक मिळेल.

4. कोरोनामुळे आजकाल प्रत्येक घरात हँड सॅनिटायझर आहे. या हँड सॅनिटायझरचा वापर करूनही चांदीचे दागिने स्वच्छ होतील. यासाठी एका भांड्यात सॅनिटायझर घ्या. त्यात चांदीचे दागिने टाका. अर्ध्या तासानंतर घासून पुन्हा सॅनिटायझरमध्ये बुडवा. काही वेळाने कोमट पाण्याने धुवा. चांदीचे दागिने चमकतील.

5. जर चांदी फारशी काळी नसेल तर लिंबाच्या रसात थोडे मीठ टाकूनही ते साफ करता येते. याशिवाय गरम पाण्यात डिटर्जंट टाकून त्यात चांदी काही वेळ राहू द्या. त्यानंतर ती स्वच्छ करा. काही वेळातच चांदीचे दागिने चमकू लागतील.


हेही वाचा :


1000 ऐवजी 1K का लिहितात? जाणून घ्या!


तरुणाईचा “सैराट” फिवर उतरेना; सिनेमापेक्षाही भयानक चित्र मिळतय पहायला


धक्कादायक! प्रियकरासोबत मिळून केली पती अन् सासऱ्याची हत्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *