उन्हाळ्यात शरीराला आतून थंड ठेवतात या गोष्टी..!

दुधी भोपळा –
दुधी भोपळ्याची चव थंडावा देणारी आहे. त्यात भरपूर पाणी आढळते. याव्यतिरिक्त हे पोटासाठी देखील खूप चांगले आहे. उन्हाळ्यात दुधी खाल्ल्यानं पचनक्रियाही चांगली राहते. दुधीमुळे उन्हाळ्यात शरीर थंड राहण्यास मदत होते. भाजीव्यतिरिक्त दुधीचा रायता बनवून उन्हाळ्यात प्यायलाही काहींना आवडतो.(summer foods)
कांदा –
उन्हाळ्यात उष्माघात टाळण्यासाठी कांदा खायला हवा. उन्हाळ्यात कांदा शरीराला थंड ठेवण्यास मदत करतो. उन्हाळ्यात तो भाज्यांबरोबरच सॅलडमध्ये मिसळूनही खाता येतो. कांदा शिजवून खाल्लेला अधिक चांगला जेणेकरून त्याचे शरीराला अधिक फायदे मिळतात. मुलांना उष्णतेपासून वाचवण्यासाठी बर्गर किंवा सँडविचमध्ये कच्चा कांदा घालून त्यांना खायला देता येऊ शकतो.(summer foods)
काकडी –
उन्हाळ्यात काकडी खाल्ल्याने शरीरात पाण्याची कमतरता भासत नाही. याशिवाय काकडी सन स्ट्रोकपासूनही आपलं संरक्षण करते. फायबर समृद्ध काकडीमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते. ती खाल्ल्याने शरीराला थंडावा मिळतो आणि ताजेपणाही राहतो. उन्हाळ्यात काकडीची कोशिंबीर आणि रायता नक्की खायला हवा. काकडी खाल्ल्याने पोटाचे आजार कमी होतात आणि बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून सुटका मिळते. काकडी शरीराला आतून थंड ठेवते आणि ऊर्जा देते.
दही –
दही खाणे आरोग्यासाठी खूप चांगले असते. दही केवळ चवीलाच अप्रतिम नसून ते अनेक आजारांना शरीरापासून दूर ठेवते. उन्हाळ्यात दही खाल्ल्याने शरीर थंड राहते आणि पोटाचा त्रास होत नाही. दही खाल्ल्याने पचनक्रियाही व्यवस्थित राहते. लोकांना दह्यापासून बनवलेले रायतेही आवडतात. त्याचबरोबर काही लोकांना उन्हाळ्यात लस्सी प्यायलाही आवडते. उन्हाळ्यात उष्माघात टाळण्यासाठी दही किंवा ताक नक्की खायला हवे.
मिंट –
उन्हाळ्यात पुदिन्याची चटणी किंवा सरबत खाल्ल्याने शरीर थंड राहण्यास मदत होते. पुदिन्याची चटणी किंवा जलजीरा बनवून पुदीना पिता येतो. पुदिन्यामुळे शरीराला त्वरित थंडावा मिळतो आणि सन स्ट्रोकपासूनही लोकांचे संरक्षण होते.
हेही वाचा :