शरीराची दुर्गंधी घालवण्यासाठी करा ‘हे’ उपाय..!

सध्या उन्हाळा (summer season) ऋतू सुरू झाला आहे. त्यामुळे वातावरणातील उष्णतेचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे आपल्या शरीराचेही तापमान वाढते. शरीराचं तापमान वाढलं की, आपल्याला घाम येऊ लागतो आणि काही वेळानंतर आपल्या संपूर्ण अंगाचा दुर्गंध वास येऊ लागतो.

येणारी दुर्गंधी लपवण्यासाठी अनेकजण महागडे परफ्युम वापरतात.परंतू आज आम्ही तुम्हाला घरगुती उपयुक्त उपाय सांगणार आहेत.

कडूलिंबु (Neem)
कडुलिंबात बॅक्टेरियाविरोधी गुणधर्म (Antibacterial Properties) असतात, ज्याचा वापर करून शरीरातून येणारी दुर्गंधी सहजपणे दूर केली जाऊ शकते. यासाठी एक कप पाण्यात कडुलिंबाच्या तेलाचे सुमारे दोन थेंब टाका. त्यात एक टॉवेल बुडवा आणि त्याद्वारेआपले बगल पुसून टाका.(summer season)

– ऍपल व्हिनेगर (Apple Vinegar)
ऍपल सायडर व्हिनेगर त्वचेची पीएच पातळी संतुलित ठेवते. काखेतुन येणारा दुर्गंध दूर करण्याचे काम करते. यासाठी एक मग पाण्यात थोडेसे व्हिनेगर टाका आणि त्यानं तुमची ओरंपिट स्वच्छ करा.

– बेकिंग सोडा (Baking Soda)
बेकिंग सोडा हा देखील शरीरातून येणारा दुर्गंध दूर करण्याचा एक अतिशय उपयुक्त उपाय आहे. यासाठी तुमच्या अंडरआर्म्सवर बेकिंगसोडा लावा. बेकिंग सोडा घाम सहजपणे शोषून घेतो. जे वास येण्याचे मुख्य कारण आहे.

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

हेही वाचा :


शरद पवार उद्या शिरोळमध्ये..!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *