विधवा सूनेसाठी सासूने घेतले चक्क तरुणाला दत्तक; समाजासमोर ठेवला आदर्श

marriage

कोरोना काळात अनेक कुटुंबांवर मोठा आघात झाला. कुणाचा मुलगा तर कुणाचे आई-वडीलांचे निधन झाले. त्यामुळे त्या कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला.(marriage)

पण त्यातून काही कुटुंबांनी स्वतःला सावरले. अशाच एका मातेने मुलगा व पतीच्या निधनानंतर संकटांवर धैर्याने मात केली. मुलाच्या मृत्यनंतर एका गुजरातमधील एका कुटुंबियाने सुनेचं दुसरं लग्न(marriage) लावून दिलं आहे. त्यांच्या या निर्णयाचं सगळ्यांना कौतुक वाटलं आहे. गुजरातच्या राजकोट भागात हे आदर्शवत पाऊल उचललं आहे. राजकोठमधील कोठडीया कुटुंबातील मुलाचा मृत्यू झाल्यानंतर कुटुंबाने एका तरुणाला दत्तक घेतलं. त्यानंतर त्याच्याशी आपल्या सुनेचं दुसरं लग्न लावून दिलं आहे.

विशेष म्हणजे हा लग्न सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला आहे. किचन वेअर व्यवसायात असलेल्या चंदू भाई कोठडीया आणि त्यांचा मुलगा सम्राट कोठडीया कोरोनाच्या काळात मृत्यू झाला. त्यानंतर कोठडीया कुटुंबात मोठा प्रश्न निर्माण झाला होता. सम्राट याला कोरोनाच्या काळात ताप आला त्यावेळी त्यांना त्यांच्या घरच्यांनी डॉक्टरकडे जाण्याचा सल्ला दिल्ला. त्यावेळी सम्राट यांनी त्यांच्या फॅमिली डॉक्टरकडे जाऊन उपचार घेण्यास सुरुवात केली. त्यावेळी आठ दिवस उपचार घेतल्यानंतरही सम्राटचा ताप कमी होत नव्हता. त्यावेळी सम्राट यांची कोरोनाची टेस्ट करण्यात आली. कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर घरच्यांना मोठा धक्का बसला त्यामध्ये सम्राटचा मृत्यू झाला.

सम्राटचं निधन आणि तसेच त्याच्या वडिलांचंही कोरोनामुळे निधन झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला. कारण सम्राटनंतर त्याची दोन मुले पत्नी यांची मोठी जबाबदारी त्यांच्या कुटुंबियांवर येऊन पडली. सम्राट यांच्या आईला अधिक चिंता वाटत होती. त्यावेळी सगळे एका खोलीत झोपत होतो, असे सम्राट आईने सांगितले. कारण एकाचवेळी घराच दोन जणांचा मृत्यू झाला होता. अनेकवेळा सासु सुना दोघी एकत्र बसून रडत असायचो. त्यावेळी त्यांनी एकताचं लग्न(marriage) लावण्याचं हिशोबाने विचार सुरु केला. दोन मुले असल्याने काय करता येईल असाही विचार त्यांच्या डोक्यात आला.

परंतु कोठडीया कुटुंबाने शेवटी एका तरुणाला दत्तक घेण्याचा विचार केला. त्यावेळी त्यांची रवी असोदिया या तरुणाची ओळख झाली. त्याने दोन मुलांसह त्यांच्या आईचा हसतमुखाने स्विकार केला. मला कायम नागरिकांची मदत करायला आवडते. ज्यावेळी मला एकता आणि त्यांच्या मुलांविषयी माहिती समजली त्यावेळी मी त्यांचा स्विकार करण्याचा विचार केला, अशी माहिती रवी असोरदिया यांनी सांगितले.

Smart News:-