शरीराच्या ‘या’ ५ भागांवर परफ्युम लावल्याने काय होतं?

जेव्हा आपण आपले आवडते परफ्युम (perfume) लावतो तेव्हा त्याचा प्रभाव जास्त वेळ टिकत नाही. काही वेळातच त्याचा सुगंध गायब होतो. त्यामुळे आपली निराशा होते. पण जेव्हा तुमचा जोडीदार तुमच्यावर प्रेम व्यक्त करणार असतो तेव्हा परफ्युमचा गंध नाहिसा झालेला असतो. तेव्हा तुम्हाला आणखी निराशा येते. प्रेमात असताना परफ्युमचा गंधही तुमचे नाते आणखी खुलवतो. म्हणूनच तुमच्या आवडत्या परफ्यूमचा सुगंध बराच काळ टिकून राहण्यासाठी काय करता येईल हे जाणून घेणे गरजेचे आहे. शरीराच्या या अवयवांवर तुम्ही कोणताही परफ्यूम लावल्यास त्याचा प्रभाव बराच काळ टिकतो.

perfume

छाती – पहिल्यांदा शरीराच्या या भागावर मॉइश्चरायझर लावा. त्यानंतर तुमचे आवडते परफ्यूम (perfume) येथे लावा. तुमच्या आजूबाजूला वावरणाऱ्या लोकांना उत्तम सुगंध जाणवेल.

perfume

मान – गळ्यावर परफ्यूम अनेक वर्षांपासून लावले जाते. याचे कारण म्हणजे एकमेकांवर प्रेम करणाऱ्या जोडप्यांसाठी हे एक खास ठिकाण आहे. जवळीक साधताना शरीराचा हा भाग सर्वात जवळ असतो, म्हणून मान सुगंधी असणे त्यावेळी गरजेचे असते.

perfume

मनगट -मनगटावर परफ्युम लावल्याने त्याचा सुंगध बराच काळ टिकतो. मगटावर परफ्युम लावल्यानंतर ते सुकू द्या. पण येथे परफ्युम लावण्यापूर्वी ती जागा चांगली मॉइश्चराईज करा.

कोपर – शरीराच्या या भागावर हलकेच परफ्युम मारा. थोडं चोळा. यामुळे तुमच्या आजुबाजुच्या लोकांपर्यंत त्यांचा सुगंध पसरेल. शिवाय तुम्हालाही ताजेतवाने वाटेल.

perfume

कपड्यांवर लावा – शरीराच्या सर्व भागांवर परफ्यूम लावल्यानंतर तुम्ही कपड्यांवरही परफ्युम लावा. कारण त्यामुळे तुमच्या कपड्यांवरही सुगंध जाणवेल. नाहीतर सर्व प्रयत्नांवर पाणी फेरले जाईल, त्यामुळे अशी चूक अजिबात करू नका.

perfume

हेही वाचा :


जेनेलिया दिसणार लवकरच ‘या’ अभिनेत्यासोबत..!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *