Women Health: कळत-नकळत अनेक महिला करतात या चुका!

काही स्त्रिया सहसा त्यांच्या पोशाख आणि बाह्य सौंदर्याकडे खूप लक्ष देतात, (women health) परंतु वैयक्तिक स्वच्छता राखत नाहीत. अनेकदा जे लोक कमी आंघोळ करतात, ते परफ्युमचा वापर करतात, त्यामुळे त्यांच्या अंगाला वास येत नाही. पण तसं करणं योग्य नाही. बाह्य सौंदर्याबरोबरच आंतरिक सौंदर्य देखील महत्त्वाचे आहे. वैयक्तिक स्वच्छता राखणे फार महत्त्वाचे आहे. कारण, त्यामुळे आरोग्याशी संबंधित अनेक आजार होत नाहीत. वैयक्तिक स्वच्छतेमध्ये अनेक गोष्टींचा समावेश होतो, जसे की हात धुणे, आंघोळ करणे, स्वत:ला तयार करणे, स्वच्छ कपडे घालणे इ. आज आपण बहुतेक महिलांकडून होणाऱ्या सामान्य चुकांबद्दल जाणून घेणार (Women Health tips) आहोत.

शरीर स्वच्छ न ठेवणे –

अनेकदा स्त्रिया (women health) आपले शरीर स्वच्छ ठेवत नाहीत, ही सर्वात कॉमन चूक आहे. शरीर नेहमी स्वच्छ ठेवले पाहिजे. दिवसातून दोनदा ब्रश केला पाहिजे. यामुळे तोंडाला वास येणार नाही. दर तीन महिन्यांनी तुमचा टूथब्रश बदला.

यासोबतच रोज आंघोळ करावी. यामुळे शरीर तर स्वच्छ राहतेच, पण तुम्हाला उत्साही वाटेल. पण, आंघोळ म्हणजे फक्त अंगावर साबण घासणे असे नाही. तुम्ही तुमच्या शरीराचा प्रत्येक भाग पूर्णपणे स्वच्छ केला पाहिजे. यामुळे तुम्हाला त्वचेच्या समस्या होणार नाहीत. त्यामुळे रोज आंघोळ नक्की करा.

पर्सनल ग्रूमिंग –

पर्सनल ग्रूमिंग खूप महत्त्वाचे आहे. मात्र, बहुतांश महिला त्याचे पालन करत नाहीत. हात आणि पायांची नखे नेहमी कापावीत. कारण अनेकदा नखांमध्ये घाण साचते, ज्यामुळे आपण आजारी पडू शकता. त्यामुळे तुमच्या नखांचीही काळजी घ्या. तुमची नखं निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही क्युटिकल्सला रबिंग अल्कोहोल लावा. कटिकल्स कापू किंवा ट्रिम करू नका. नखे वाढू लागताच ते कापून टाका.

बहुतेक मुली ही चूक करतात की त्या केस रोज विंचरत करत नाहीत, ज्यामुळे त्यांचे केस खराब होतात आणि लवकर तुटतात. म्हणूनच केसांना रोज विंचरावे. तसेच आठवड्यातून दोनदा केस धुवा.

गलिच्छ अंतर्वस्त्र परिधान करणे –

वैयक्तिक स्वच्छतेचा अर्थ म्हणजे आपण सर्वांनी आपली अंतर्वस्त्रे दररोज बदलली पाहिजे. यामुळे वैयक्तिक स्वच्छता राखली जाते. पण अनेक वेळा महिला घाईघाईत घाणेरडे अंडरगारमेंट घालतात. त्यामुळे अनेक प्रकारचे संसर्ग होण्याचा धोका असतो. घाणेरड्या कपड्यांवर बॅक्टेरिया वाढतात. पण केवळ अंडरगारमेंट्स बदलणेच नाही तर ते प्रायव्हेट भाग व्यवस्थित स्वच्छ करणेही आवश्यक आहे. कपडे धुण्यासाठी बाजारात खास साबण आणि डिटर्जंट्स उपलब्ध आहेत. त्यामुळे त्यांना सामान्य डिटर्जंट आणि कपड्यांसोबत धुवू नका.

मासिक पाळीची स्वच्छता न पाळणे –

महिला अनेकदा मासिक पाळीत स्वच्छता राखत नाहीत, त्यामुळे योनीमार्गात संसर्ग होण्याची शक्यता असते. त्यामुळे मासिक पाळी दरम्यान तुम्ही तुमच्या आरोग्याची अत्यंत काळजी घेतली पाहिजे. या काळात दिवसातून 2-3 वेळा पॅड बदला. तुम्ही पॅडऐवजी टॅम्पन्स आणि मासिक पाळीसाठीचे कप देखील वापरू शकता. मासिक पाळी दरम्यान हे सर्वात सुरक्षित स्त्रीलिंगी उत्पादने आहेत. या काळात रोज आंघोळ करावी.

या गोष्टी लक्षात ठेवा

वैयक्तिक स्वच्छता राखण्यासाठी, आपण आपले हात वारंवार धुवावेत.

दररोज कपडे बदलण्यास आणि धुण्यास विसरू नका.

नीटनेटके अंतर्वस्त्र घाला.

दिवसातून दोनदा ब्रश करा.

हेही वाचा :


बूस्टर डोसबाबत राजेश टोंपेंचं महत्त्वाचं वक्तव्य!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *