लिफ्ट सफाई कर्मचाऱ्यांकडून शाळेतील 3 चिमुकलींची छेडछाड ; बदलापूर घटनेची पुनरावृत्ती

बदलापूरमधील एका प्रतिथयथ शाळेतील(school) दोन चिमुरड्यांवर त्यांच्याच शाळेत काम करणाऱ्य अक्षय शिंदे या सफाई कामगाराने लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली होती. या घटनेने संपूर्ण देश हादरला होता. असे असताना आता भांडुपमधून धक्कादायक बातमी समोर येत आहे. भांडुपमधील एका नामांकित शाळेत तीन मुलींसोबत गैरवर्तन करण्याचा प्रकार समोर आला.

दरम्यान भांडुपमधील नामांकित शाळेत(school) 10 ते 11 वर्षांच्या तीन मुलींसोबत गैरवर्तन करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. शाळेच्या लिफ्ट मेकॅनिकने गैरवर्तन केल्याचा आरोप केल्याचे मुलींनी पालकांना सांगितले. पालकांच्या तक्रारीनंतर पॅाक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला असून सध्या आरोलिसांच्या ताब्यात घेण्यात आले आहेत.

शाळेत योगा शिकणाऱ्या विद्यार्थ्यींनीसोबत हा संतापजनक प्रकार घडल्याचे समोर आलं. विद्यार्थ्यींनीनी या घटनेची माहिती दिल्याने हा सर्व प्रकार उघडकील आला आणि त्यानंतर पोलिसांमध्ये या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला.

मिळालेल्या माहितीनुसार 27 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 ते 1.30 वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला. शाळेच्या बेसमेंटमध्ये 10 वर्षांची आणि एक 11 वर्षांची अशा दोन मुली योगा करत होत्या. दरम्यान, शाळेच्या लिफ्टची सफाई व देखभाल करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून या चिमुकलींची छेडछाड करण्यात आली. त्यानंतर घडलेल्या या प्रकाराची तक्रार विद्यार्थीनीनी योगा शिकणाऱ्या शिक्षिकेसह आपल्या कुटुंबीयांकडे केली. या प्रकरणाचे गांभीर्य लक्ष्यात घेता बेसमेंटमध्ये असलेले सीसीटिव्हीची तपासणी केली असता या संपूर्ण प्रकरणाची सत्यता उजेडात आली.

या प्रकरणी भांडुप पोलिसांनी तक्रार नोंदवत गुन्हा दाखल केला. यामध्ये भारतीय न्यायिक संहिता 74, 78 आणि POCSO 8, 12 नुसार गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित आरोपीला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी पीडित विद्यार्थीनीच्या कुटुंबियांचे म्हणणे आहे की, हे प्रकरण पोलिसांपर्यंत जायला नको, या साठी शाळेकडून पलाकांवर दबाव टाकण्यात आला. तसेच जेव्हा पालक शाळेत गेल्यावर सीसीटिव्हीची तपासणी करायची मागणी केली असता त्याने शाळेकडून सहकार्य न केल्याचे आरोपही पीडित विद्यार्थीनीच्या कुटुंबियांकडून करण्यात आले आहे.

गेल्या काही दिवसांपासून लहान मुलींवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. ठाणे जिल्ह्यातील बदलापूरमधील एका नामांकित शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचाराची घटना काही महिन्यांपूर्वी घडलीय. या घटनेनंतर सर्वत्र संतपाची लाट उसळली होती.असे असताना तीन दिवसापूर्वी सायन कोळीवाडा परिसरात सोमवारी रात्री एका तीन वर्षीय चिमुरडीवर नराधमाने अत्याचार केल्याची घटना घडली आहे. अत्याचार करणाऱ्या गर्दुल्याला स्थानिकांनी चांगलेच चोपले आणि पोलिसांच्या हवाली केली.

हेही वाचा :

दिल्लीने डोळे वटारले तर… शिंदेकडे काही पर्याय नसेल; संजय राऊतांचा हल्लाबोल

शाळांना सुट्टी ! मुसळधार पाऊस, चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर सरकारने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय

दिल्लीच्या बैठकीत मोठी खलबतं; 20 मिनिट चर्चा अन् शाहांसमोर एकनाथ शिंदेंनी ठेवले मोठे प्रस्ताव