शेतकऱ्यांचे दोन लाखांपर्यंतचे कर्ज होणार माफ; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

रांची : शेतकऱ्यांच्या दृष्टीने सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे(Govt). त्यात मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्यात आला आहे. त्यानुसार, आता राज्यातील सरकार शेतकऱ्यांचे 50 हजार ते 2 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करणार आहे. याबाबतचा निर्णय झारखंड सरकारने घेतला आहे. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यामध्ये हा महत्त्वपूर्ण निर्णय झाला.

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीशिवाय 38 प्रस्तावांना झारखंड(Govt) राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. झारखंड कृषी कर्जमाफी योजनेत सुधारणा करण्याच्या प्रस्तावाला बैठकीत मान्यता देण्यात आली. आता झारखंडमधील शेतकऱ्यांचे 2 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ होणार आहे. 31 मार्च 2020 पूर्वी घेतलेले 2 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ केले जाणार आहे. सरकारने सुरुवातीला 50 हजार रुपयांपर्यंतची कर्जमाफी दिली होती. यामध्ये 4 लाख 73 हजार 567 शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात आली.

यापूर्वी सरकारने दोन लाख रुपयांपर्यंतचे कृषी कर्ज माफ करण्याची घोषणा केली होती. यासंदर्भात 14 जून रोजी राज्यस्तरीय समितीची बैठक झाली. या बैठकीत झालेल्या निर्णयाच्या आधारे मंत्रिमंडळाने कर्जमाफी योजनेत सुधारणा केली आहे. आता राज्यातील सुमारे 4.75 लाख शेतकऱ्यांचे 2 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ होणार आहे.

झारखंड कृषी कर्जमाफी योजनेंतर्गत लाभ एकाच कुटुंबातील एकाच सदस्याला मिळणार आहे. त्याची पडताळणी कोणत्याही प्रकारच्या शिधापत्रिकेद्वारे करता येते. 2024-25 या आर्थिक वर्षात 2 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ केले जाईल. त्याची कट ऑफ डेट 31 मार्च 2020 ठेवण्यात आली आहे. यासाठी सुमारे 750 कोटी रुपये खर्च होण्याची शक्यता आहे.

झारखंड कृषी कर्जमाफी योजनेअंतर्गत, 2020-21 ते 2023-24 या आर्थिक वर्षात 4.73 लाख शेतकऱ्यांची 1,900.35 कोटी रुपयांची कर्जे माफ करण्यात आली. यापूर्वी सरकारने दोन लाख रुपयांपर्यंतचे कृषी कर्ज माफ करण्याची घोषणा केली होती. यासंदर्भात 14 जून रोजी राज्यस्तरीय समितीची बैठक झाली.

हेही वाचा :

कोल्हापुरातील चिमुकल्यांन हलगीवर धरला जबरदस्त ठेका…Video Viral

‘माझ्यावर चढू नकोस’, फोटोग्राफर्सवर भडकली तापसी पन्नू

कोल्हापुरातील भोसले नाट्यगृहाला आग लावली की लागली? जरांगेंनी उपस्थित केली शंका